शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीट मार्शलच्या दुचाक्या नादुरुस्त

By admin | Updated: April 22, 2016 00:49 IST

शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट मार्शल यांना देण्यात आलेल्या अनेक दुचाक्या जुन्या झाल्या असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत.

नेहरुनगर : शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट मार्शल यांना देण्यात आलेल्या अनेक दुचाक्या जुन्या झाल्या असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत. अनेक दुचाकींना पिकअप नसल्यामुळे अनेक घटनांत चोरांचा पाठलाग करताना डोळ्यासमोरून चोरटे ‘धूम स्टाईल’ निसटून जातात. दलाच्या वतीने पोलिसांना आठ वर्षांपूर्वी १५० सीसीच्या दुचाक्या शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड, हिंजवडी, सांगवी, भोसरी एमआयडीसी, चतु:शृंगी या पोलीस ठाण्यांना प्रत्येकी ४ आणि प्रत्येक चौकीला एक दुचाकी देण्यात आली. नागरिकाने १०० क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी तातडीने बीट मार्शलना पोहोचण्यासाठी या दुचाक्यांचा वापर केला जातो. बीट मार्शल दिवस-रात्र हद्दीत गस्त घालण्याचे काम करीत असतात. दिवसा आणि रात्र पाळीच्या बीट मार्शलसाठी एकच दुचाकी असल्यामुळे एका दिवसात अंदाजे १०० ते १२० किलोमीटर अंतर दुचाकी कापते. आतापर्यंत दीड ते दोन लाखांपेक्षा जास्त किलोमीटरचा पल्ला या दुचाक्यांनी गाठल्याने वारंवार त्या नादुरुस्त होतात. त्या दुरुस्तीसाठी शिवाजीनगर मोटार परिवहन कार्यशाळेत पाठवल्या जातात. या काळात संबंधित बीट मार्शल स्वत:ची दुचाकी वापरतात. काही वेळा बीट मार्शललाच दुरुस्ती करावी लागते. अनेक दुचाक्या जुन्या झाल्याने त्यांचे स्टार्टर खराब झाले आहे. काहींची बॅटरी खराब झाली आहे. पुरेसा प्रकाश नसल्यामुळे रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालत असताना अंधाराच्या भागात पोलिसांना कसरत करावी लागते. पिकअप नसल्यामुळे अनेक वेळा सोनसाखळी चोरट्यांचा इतर चोरीच्या आरोपींच्या दुचाकीचा पाठलाग करताना चोरटे धूम स्टाइलने पळून जातात. नागरिकाने १०० क्रमांकावर कंट्रोल रूमला संपर्क साधल्यानंतर बीट मार्शलला घटनास्थळी सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचावे लागते. मात्र, पिकअप नसल्याने वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी, गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. (वार्ताहर)एके दिवशी पहाटे अडीचच्या सुमारास गस्त घालत असताना आमच्या समोरून एक चोर ट्रक चोरून घेऊन जात असताना पाहिले. आम्ही हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर ट्रक अतिवेगात पळून जाऊ लागला. दुचाकी सुरू करून त्या ट्रकचालकाचा पाठलाग केला असता, पिकअप नसल्यामुळे पाठलाग करताना अधिक वेळ लागत होता. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रकचालक पुढे जाऊन ट्रक सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. अनेक वेळा आरोपींचा पाठलाग करताना दुचाक्यांना पिकअप कमी असल्यामुळे अनेक वेळा चोरटे पळून जाण्यात यशस्वी होतात. यामुळे बीट मार्शल पोलिसांना नवीन, आधुनिक जास्त सीसी असलेल्या दुचाक्या देण्यात याव्यात. जेणेकरून तत्काळ घटनास्थळी जाता येईल, असे बीट मार्शलने सांगितले.