शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हा आत्मनिर्भर; ३२५ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:15 IST

(स्टार ११२९ डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही ...

(स्टार ११२९ डमी)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच वर्षे राबविण्यात येत आहे. यांतर्गत प्रकल्पाच्या खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातून यासाठी एका वर्षात ३२५ जणांना याचा लाभ होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील उपसंचालक विजय कानडे यांनी सांगितले.

सध्या कार्यरत असलेले वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायत्ता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादकांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे, तसेच अन्न-प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण यावर भर देणे हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे.

----

* कोणाला घेता येणार लाभ?

प्रकल्पाच्या खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहेत. यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, सहकारी उत्पादक यांना सार्वजनिक सोयी- सुविधा केंद्र, फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजस, भांडवल गुंतवणूककरीता खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे. तसेच मार्केटिंग व ब्रँडिंग या घटकांकरीता एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणुकीकरीता (बियाणे भांडवल) ४ लाख रुपये प्रति बचतगट एवढा लाभ दिला जाणार आहे. या गटातील कमाल १० सदस्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये बियाणे भांडवल म्हणून देण्यात येणार आहे.

----

... असा करा अर्ज

योजनेअंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक वैयक्तिक लाभार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करायचे आहेत. त्यासाठी http:pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, सहकारी उत्पादक यांनी ऑफलाइन अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचे आहेत.

----

कोट

पुणे जिल्ह्याकरीता लाभार्थी निवडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने एकूण ७ संसाधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. ही निवड समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करणार आहेत. या योजनेअंतर्गत सन २०२१-२२ करीता पुणे जिल्ह्याकरीता सर्वसाधारण वैयक्तिक लाभार्थ्यांकरीता २८०, अनुसूचित जातीकरीता ३५ तसेच अनुसूचित जमातीकरीता १० असे एकूण ३२५ जणांना निधी देण्यात येणार आहे.

- विजय कानडे, उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय