शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हजर व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

By admin | Updated: June 10, 2015 05:28 IST

शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बदली झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा सज्जड दम महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बदली झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा सज्जड दम महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच जे कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर कडक करवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या बदलीचा तिढा मंगळवारीही न सुटल्याने या कर्मचाऱ्यांनी महापालिका भवनाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. तर या बदल्या रद्द करण्यास पालिका प्रशासनानेही नकार दिला असल्याने या वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. शिक्षण मंडळाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आल्यानंतर मंडळाने पहिल्यांदाच शिक्षक, रखवालदार आणि शिपाई यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हे बदल्यांचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मात्र शिक्षक संघटनांनी या सरकट बदल्यांना विरोध करीत त्या रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. मंगळवारी बदल्या रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी संघटनांच्या वतीने पालिका भवनासमोर निदर्शने करण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज स्थायी समितीमध्येही काही सदस्यांनी महापालिका भवनाबाहेर जमलेल्या गर्दीबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, कोणत्याही बदल्या रद्द करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. ज्या शिक्षक, रखवालदार आणि शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ते बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)