शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘रिफाइंड’ असो की लाकडी घाणा...तेल कमीच आणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

पुणे : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. मात्र, अशा ...

पुणे : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. मात्र, अशा जाहिरातींना भुलून तेलाची निवड करण्यापेक्षा आपली जनुके, वास्तव्याचे ठिकाण, परंपरा लक्षात घेऊन तेलाची निवड करणे आवश्यक असते. तेल घाण्याचे असो की रिफाइंड ते कमीच वापरावे, याकडे हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

आहारात तेलाचा जास्त वापर केल्याने रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग आदी विकारांना आमंत्रण मिळते. अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील ‘बॅड कोलेस्टेरॉल’ वाढते आणि हृदयाशी संबंधित विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची दुकाने पाहायला मिळत आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात ‘गुड कोलेस्टेरॉल’ अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ‘ट्रेंड’ला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.

चौकट

“सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असलेली तेले हृदयाला जास्त हानिकारक असतात. त्यातुलनेत मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असलेली तेल हृदयासाठी चांगली मानली जातात. रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. शेंगदाण्याचे तेल लाकडी घाण्यातील असले तरी ते ‘सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड’युक्त असल्याने हृदयासाठी हानिकारक ठरते. हृदयासाठी ऑलिव्ह, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, राईस ब्रॅन या प्रकारची तेले चांगली मानली जातात. मात्र, कोणतेही तेल परिपूर्ण नसते. त्यामुळे तेलांचे मिश्रण वापरता येईल किंवा एक तेल एक महिना या पद्धतीने तेल वापरण्याचे वेळापत्रक आखता येईल. आपण ग्रामीण शैलीकडे पुन्हा वळत असलो तरी आधुनिक विज्ञान नाकारणे शक्य होणार नाही. आधुनिक विज्ञानाच्या आधारे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न व्हावा.”

-डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ज्ञ

चौकट

चौकोनी कुटुंबाला महिन्याला दोन किलो

“रिफायनिंग तेलात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. अशुद्धपणा घालवण्यासाठी अ‍ॅसिड वापरले जाते. त्यातील व्हिटॅमिन्सही निघून जातात. त्यामुळे लाकडी घाण्यावरील तेलाला प्राधान्य दिले जाते. गाळलेले तेल आहारात समाविष्ट करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. पूर्वी तेलाचे रिफायनिंग होत नव्हते. त्यावेळी रासायनिक प्रक्रिया न केलेले तेलच वापरले जात असे. तुपाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर डालड्याचा पर्याय आला. डालडा म्हणजेच पाम तेलातील रसायनांचे प्रमाण घातक असल्याचे लक्षात येताच ते प्रमाण कमी झाले. प्रत्येक तेलाचा वितळण बिंदू वेगवेगळा असतो. त्यामुळे तेलाची योग्य निवड महत्त्वाची ठरते. एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. आपली जनुके, वास्तव्याचे ठिकाण यानुसार तेल निवडावे. रिफाइंड असो की लाकडी घाण्याचे, तेलाचे आहारातील प्रमाण कमीच असले पाहिजे. प्रत्येक वनस्पती तेल कोलेस्टेरॉलमुक्तच असते. तेलाऐवजी अधूनमधून तुपाचा, लोण्याचा वापरही करता येईल.”

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ