शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! तुमच्यावर आहे लक्ष

By admin | Updated: March 30, 2016 02:15 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त मजकूर, छायाचित्रे टाकून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त मजकूर, छायाचित्रे टाकून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. यापुढे सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, त्यासाठी ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब’ सुरू करण्यात आली आहे. ही लॅब २४ तास कार्यान्वित ठेवली जाणार आहे. दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या लॅबद्वारे आक्षेपार्ह ६५ लिंक डिलीट करण्यात आल्या आहेत.सायबर विभागाच्या वतीने तयार केलेल्या या लॅबचे उद्घाटन मंगळवारी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, सायबर विभागाचे उपायुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, लॅब तयार करण्यात सहकार्य करणारे आयक्यूएसएस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेरॉल्ड डिकोस्टा या वेळी उपस्थित होते. फेसबुक, टिष्ट्वटर, यू ट्यूब यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येणारे आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे, राजकीय, धार्मिक व सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात मजकूर टाकल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर या लॅबद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात येईल. शहरात होणारे मोर्चे, धरणे, आंदोलने यांबाबत आगाऊ माहिती घेण्यासाठीही या लॅबचा वापर केला जाणार आहे. तसेच, दहशतवादी व नक्षलवादी कारवायांसंबंधी माहिती शोधून संबंधित विभागाला पुढील कारवाई करण्यासाठी पाठविण्यात येईल. तीन शिफ्टमध्ये २४ तास पोलीस कर्मचारी सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी १८ कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. दोन महिन्यांपासून हे प्रशिक्षण सुरू होते. फेसबुक, यू ट्यूब, टिष्ट्वटर यांवर स्वतंत्र कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत.३ शिफ्टमध्ये २४ तास ठेवणार लक्षया लॅबसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये तीन शिफ्टमध्ये २४ तास पोलीस कर्मचारी सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी १८ कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ नाहीकायद्याच्या चौकटीत राहून लॅबचे कामकाज केले जाईल. या चौकटीत राहूनच कोणच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली जाणार नाही. पोलिसांकडे कोणाकडून तक्रार येण्यापूर्वीच अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शोधून कारवाई केली जाईल.- के. के. पाठक, पोलीस आयुक्तशहरामध्ये होणारे मोर्चे, धरणे, आंदोलने यांबाबत आगाऊ माहिती घेण्यासाठीही या लॅबचा वापर केला जाणार आहे. आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या लॅबद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.