शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतीवरून श्रेयाची लढाई

By admin | Updated: April 10, 2017 01:46 IST

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची

पिंपळवंडी : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर या यशाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाची लढाई सध्या जोरात सुरू असून, या श्रेयवादाच्या लढाईत बाजी कोण मारणार, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावरून याचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.जुन्नर, आंबेगाव, खेड या तीन तालुक्यांत जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या बैलगाडाशर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. या बंदीमुळे ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या बैलगाडा शर्यती बंद झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे बैलगाडा शौकीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील जत्रांवरही याचा परिणाम दिसून आला. या बंदीमुळे जत्रांमध्ये होणारी आर्थिक उलाढाल मंदावली. आपल्या पोटच्या मुलापेक्षाही बैलांना जिवापाड जपणारा शेतकरी या निर्णयामुळे खचला. कारण लाखो रुपये किमतीचे बैल काही हजार रुपयांमध्ये विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकरणात लक्ष घातले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली तसेच लोकसभेत बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविण्याची मागणी केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही बैलगाडामालक संघटनेच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही पाठपुरावा सुरु करत आपले संपूर्ण वर्चस्व पणाला लावले. राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल करून ते विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडले. या विधेयकास दोन्हीही सभागृहातील विरोधी पक्षांनीही विरोध न करता मंजुरी देऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले. (वार्ताहर)शर्यत सुरू होणार हेच महत्त्वाचे बैलगाडा शर्यत सुरू करण्याचे श्रेय कुणीही घ्या; बैलगाडा शर्यत सुरू होणार हे चांगलं झालं, अशी बोलकी प्रतिक्रिया एका बैलगाडामालकाने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलगाडा शर्यत सुरू झाली हे महत्त्वाचे आहे. राजकीय नेते मात्र श्रेयवादातच अडकलेले दिसून येत आहे.