शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना मिळेनात मूलभूत सुविधा

By admin | Updated: March 21, 2016 00:31 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या औद्योगिक परिसरात रासायनिक दूषित सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि अग्निशमन दलाची जागा मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. उद्योजक आणि कामगारांना पाणी टंचाईचा सामना बारा महिने करावा लागत आहे. महापालिकेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या एमआयडीसीच्या उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्त आहे. भोसरी आणि चिंचवड भागात एमआयडीसी आहे. तसेच तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, शांतीनगर, आनंदनगर, गुळवेवस्ती आदी भागांत मध्यम आणि लघु उद्योग आहेत. एमआयडीसी महापालिकेकडे १९८२ला हस्तांतरित झाली. महापालिकेला एकूण महसूल करापैकी ३० ते ४० टक्के कर औद्योगिक परिसरातून मिळतो. मात्र, या क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.महापालिका उद्योजकांकडून ४ टक्के मलनिस्सारण कर वसूल केला जातो. मात्र, या भागात भूमिगत गटार योजना नाही. मध्यम व लघु उद्योगांमध्ये जमा झालेले रसायनमिश्रित दूषित सांडपाणी सेफ्टी टँकमध्ये जमा करावे लागते. टँकर बोलावून त्यांची व्यवस्था लावली जाते. काही उद्योगांतून थेट उघड्या गटारात हे सांडपाणी सोडले जाते. गटाराची नियमित सफाई होत नसल्याने ते तुंबून वाहतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शुद्धीकरण प्रकल्पासाठी २१०३ला एमआयडीसीने गवळी माथाजवळील जागा महापालिकेस दिली. मात्र, या संदर्भात काहीच कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर कचरा नियमितपणे उचलला जात नाही. येथील कुंड्या काढून नेल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. एखादी आगीची घटना घडल्यास त्वरित अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध व्हावेत म्हणून दोन ते तीन ठिकाणी अग्निशामक दलाच्या केंद्रास महापालिकेने मंजुरी दिली होती. सेक्टर दहामधील ब्लॉक एफ- टू येथे केंद्राची जागा आरक्षित केली. मात्र, अजून काहीही कार्यवाही झालेली नाही. कुदळवाडी परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, प्रशासनाची निष्क्रियता कायम आहे. सेक्टर क्रमांक ७/१० या औद्योगिक परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे खासगी टँकरने पाणी मागवावे लागते. येथे बहुतेक उद्योग आॅटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित आहेत. पाण्याचा वापर कामगार पिण्यासाठी करतात. तरीही येथे व्यापारी दराने पाणीपुरवठा केला जातो. रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. औद्योगिक परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याच ठिकाणी बेकायदेशीर भंगार दुकाने आहेत. उद्योगांकडून चोरी केलेला माल या जवळच्या दुकानात नेऊन विकला जातो. त्यामुळे चोऱ्याची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)