शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना मिळतोय कूपनलिकांचा आधार

By admin | Updated: March 25, 2017 03:40 IST

पूर्व हवेलीत यंदाच्या पावसाळ्यात जास्त पर्जन्यमान न झाल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदण्याचा सपाटा

कोरेगाव मूळ : पूर्व हवेलीत यंदाच्या पावसाळ्यात जास्त पर्जन्यमान न झाल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदण्याचा सपाटा लावला आहे. कूपनलिकेवर लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने शेतकरी कंगाल आणि कूपनलिका खोदणारे मालामाल होऊ लागले आहेत. नागरिक, शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिक वैयक्तिक वापरासाठी कूपनलिका खोदू लागले आहेत तर ग्रामीण भागातील शेतकरी पिके जगविण्यासाठी कूपनलिका खोदत आहेत. जिल्ह्यात शाश्वत पाणी नसतानाही जादा पाणी लागणारे उसासारखे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. उसाचे पीक घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना कूपनलिकेचे पाणी आहे. भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतात उभे असलेले ऊस आणि अन्य पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकरी कूपनलिका खोदणे पसंत करीत आहेत. कूपनलिका खोदणारांची संख्या अल्प होती. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून दिवसेंदिवस कूपनलिका खोदणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कूपनलिका खोदण्याच्या दरातही वाढ होऊ लागली आहे.मार्च महिन्यात प्रतिमीटर २३० ते २४० रुपये या दराने कूपनलिका खोदल्या जात आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांची ग्राहकांची संख्या मोठी व कूपनलिका खोदणाऱ्या मशिनची संख्या अल्प असल्याने अनेक शेतकऱ्यांना बुकिंग करावी लागत आहे. बुकिंग केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी मशिन उपलब्ध होत आहे. एका कूपनलिकेसाठी किमान २५ ते ८० हजार रुपये खर्च होत आहे. कूपनलिकेला पाणी लागल्यानंतरसबमर्सिबल पंप खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च वेगळाच करावा लागत आहे. हा खर्च शेतकरी फक्त पिके जगविण्यासाठी करू लागला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असला तरी शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले आहे. (वार्ताहर)