शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बसथांबा एकीकडे; प्रवासी दुसरीकडे

By admin | Updated: October 15, 2015 00:49 IST

‘जखम पायाला अन् पट्टी डोक्याला’ बहुतांश एसटी थांब्यांची अवस्था अशीच आहे. बारामती-मोरगाव-पुणे राज्य रस्त्यावरील लोणी पाटीवरील बसथांबा एकीकडे, तर प्रवासी दुसरीकडे

लोणी भापकर : ‘जखम पायाला अन् पट्टी डोक्याला’ बहुतांश एसटी थांब्यांची अवस्था अशीच आहे. बारामती-मोरगाव-पुणे राज्य रस्त्यावरील लोणी पाटीवरील बसथांबा एकीकडे, तर प्रवासी दुसरीकडे. या बसथांब्याची असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, थंडी असे बारमाही येथील प्रवासी भर रस्त्यावरच एसटीची प्रतीक्षा करताना दिसतात. लोणी पाटी येथे बारामती-पुणे मार्गाला शिरूर, सुपा, सांगवी, फलटणला जाणारा जवळचा मार्ग झाला आहे. येथे चौफुला तयार झाला आहे. बारामतीहून पुण्याकडे ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने दोन्ही ठिकाणी सतत वर्दळ सुरू असते, तर शिरूर-चौफुला-सुपा येथील फलटणकडे जाणारी वाहनांची वर्दळही सतत सुरू असते. याशिवाय बारामती-जेजुरी-बारामती ही एसटीची शटलसेवा अर्ध्या तासाला सुरू असल्याने लोणी पाटी चौफुला सतत गजबजलेला असतो. या चौफुल्याच्या पश्चिमेला एसटीशेड आहे; मात्र आधी प्रवासी तर आधी एसटी थांबते, या गदारोळात दोघेही बसथांबा सोडून भरचौकातच थांबतात. त्यामुळे एसटी थांबण्याचे ठिकाण बसथांब्याऐवजी चौक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी बस पकडण्यासाठी रोजचीच धावपळ करावी लागते. याच ठिकाणी चारही बाजूने वाहने ये-जा करीत असल्याने वाहतूककोंडी ही नित्याची झाली आहे, तर लहान-मोठे अपघातही होण्याची शक्यता प्रवासी बोलून दाखवितात.