शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

बारामतीचा पारा ३८.५ अंशांवर

By admin | Updated: March 23, 2016 01:06 IST

शहरातील तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी तापमान ३७.५ होते. दिवसेंदिवस तापमानाची तीव्रता वाढतच आहे

बारामती : शहरातील तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी तापमान ३७.५ होते. दिवसेंदिवस तापमानाची तीव्रता वाढतच आहे. त्यामुळे आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.मार्च महिन्यातच उन्हाचा चटका बसू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे वातावरणात असह्य उकाडा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी ३५ ते ३६ अंश सेल्सिअस असणारे तापमान आता ३८.५वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा पारा तापमानाची तीव्रता दर्शवितो. दुपारी रस्ते पडतात ओस...उन्हाचा चटका बसू लागल्याने दिवसा शहरातील रस्ते ओस पडत आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी पांढरी टोपी, गॉगल यांना मागणी वाढली आहे. तर, थंडीप्रमाणे नागरिक चेहरा झाकून घराबाहेर पडत आहेत. उन्हात गेल्यानंतर थंडावा मिळण्यासाठी नागरिक थंड पेयांच्या दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. त्यातून आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत.त्वचेला घातक ठरणारी सूर्यकिरणे टाळा त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल संत यांनी सांगितले, की दुपारी १२ ते ४ या कालावधीत त्वचेला घातक ठरणारी सूर्यकिरणे बाहेर पडतात. या काळात शक्य असल्यास बाहेर पडणे टाळावे. घराबाहेर पडताना पूर्ण गोलाकार असणारी हॅट वापरावी. चेहऱ्याबरोबरच उन्हाने मानेवर व्रण उठतात याची दक्षता घ्यावी. चेहऱ्याला २० प्लस एसपीएफ असणारे सनस्क्रीन लोशन वापरावे. १० ते १२ ग्लास पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. फळे, शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करावा. स्विमिंग टँकमध्ये क्लोरीन असते. अशुद्ध पाण्यामुळे आजारांत वाढ डॉ. संग्राम देवकाते यांनी सांगितले, की पाण्याची पातळी सर्वत्रच घटली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. तर, लहान मुलांमध्ये उलट्या-जुलाबांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. शुद्ध, भरपूर पाणी पिण्याची दक्षता घ्यावी. बर्फाचे पदार्थ टाळाबालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांनी सांगितले, की पालकांनी लहान मुलांच्या हट्टाला बळी पडू नये. बर्फाचा गोळा, अशुद्ध असणारे थंड खाद्यपदार्थ लहान मुलांच्या आजारपणाला कारणीभूत ठरतात. नेमक्या याच पदार्थांचा मुले उन्हाळी सुट्टीत आग्रह धरतात. लहान मुलांना पाणी उकळून द्यावे. नारळपाणी, खडीसाखर, वरणभात, फळांचा घरगुती पद्धतीने बनविलेला ज्यूस आहारात समाविष्ट करावे.ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावीडॉ. चंद्रकांत पिल्ले यांनी सांगितले, की ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. शरीरातील पाणी कमी झाल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका असतो. त्यातून मेंदूला, हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्याची भीती असते. ही वेळ टाळण्यासाठी लिंबू सरबत, फळांचा ज्यूस भरपूर प्रमाणात सेवन करावे, भरपूर पाणी प्यावे.