शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’ व्यवहारांकडे बारामतीकरांचा कल

By admin | Updated: December 24, 2016 00:13 IST

बारामती शहरात नोटाबंदीला दीडमहिना उलटल्यानंतर देखील चलन तुटवड्याच्या समस्येवर व्यापारी वर्गाने नागरिकांच्या पाठींब्यामुळे

बारामती शहरात नोटाबंदीला दीडमहिना उलटल्यानंतर देखील चलन तुटवड्याच्या समस्येवर व्यापारी वर्गाने नागरिकांच्या पाठींब्यामुळे मात केल्याचे चित्र आहे. शहरात सर्वत्र रोख व्यवहारांऐवजी कॅशलेस व्यवहारामध्ये चांगला प्रतिसाद आहे. शहरातील विविध व्यवसायांमध्ये ‘कॅशलेस’ व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक व्यवहार कॅशलेस झाल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली. कॅशलेस व्यवहारामध्ये प्रशिक्षणासाठी बँकांनीदेखील पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध प्रशिक्षण दिले जात आहे. कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी बँकांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा ठरत आहे. बारामती शहरातील अजिंक्य बझारचे मालक अतुल गांधी यांनी सांगितले, की ग्राहकांचे ७५ टक्के व्यवहार कॅ शलेस झाले आहेत. केवळ २५ टक्के व्यवहार रोखीने सुरू आहेत. ‘ कॅ शलेस’ साठी ग्राहकांचा पुढाकार अधिक आहे.शहरातील सराफ व्यावसायिक महेश ओसवाल यांनी सांगितले, की या निर्णयामुळे गरजुंची गैरसोय झाली आहे. ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या मशिन अद्याप मिळालेल्या नाहीत. या मशिनची आवश्यकता असणाऱ्यांची प्रतीक्षा यादी आहे. तर नोबल मॉलचे प्रमुख मुस्तफा बोहरी यांनी ८० ते ९० टक्के व्यवहार ‘कॅशलेस’ झाल्याचे सांगितले. या व्यवहारामुळे व्यवसाय अधिक सोपा झाला आहे. विविध योजना आणल्या आहेत. शून्य टक्के व्याजदराच्या तसेच शून्य रुपये डाऊन पेमेंट करून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे ग्राहकांना शक्य झाली आहे.बांधकाम व्यावसायिक बोराडे असोसिएट्सचे प्रमुख दत्तात्रय बोराडे यांनी सांगितले, की ‘कॅशलेस’मुळे व्यवहार व्यवस्थित होतात. सदनिका नोंदणीसाठी धनादेशदेखील स्वीकारत आहे. बांधकामासाठी आवश्यक सहित्याची खरेदी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी धनादेश वापरत असल्याचे ते म्हणाले. कोणतीही मोठी रक्कम जवळ बाळगण्याची भीती राहिली नाही.अजिंक्य बिग बझारचे अविनाश गांधी यांनी सांगितले, की ‘कॅशलेस’ व्यवहारामुळे सुट्या पैशांची समस्या मार्गी लागली आहे. ९० टक्के ग्राहक कार्डचा वापर करून खरेदी करत आहेत. एसबीआयच्या वतीने ग्राहकांना त्यांचे कार्ड स्वाईप करून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात. जेजे टीव्हीएसचे संचालक राजेश शहा यांनी सांगितले, की नोटाबंदीचा परिणाम व्यवसायावर झाला नाही. वाहनांच्या विक्रीमध्ये थोडी घट झाली आहे. वाहन नोंदणीसाठी, खरेदीसाठी कार्डद्वारे रक्कम स्वीकारण्याची सोय केली आहे. शिवाय ‘इन्कम प्रूफ’ असणाऱ्या ग्राहकांना शून्य पैशांमध्ये वाहन खरेदी करण्याची सोय केली आहे. वाहन सर्व्हिसिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना कार्डद्वारे पैसे स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. एसबीआय बँकेकडे ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी स्वाईप मशिनची ६० ते ७० टक्के व्यावसायिकांनी मागणी केली आहे. त्यापैकी डीव्हाईस मशिन देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, अधिक मागणी असणाऱ्या पोर्टेबल मशिन सध्या उपलब्ध नाहीत त्यालाच मोठी मागणी आहे. हे मशिन मोबाईलप्रमाणे कुठेही नेता येते. त्यासाठी बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितली.बांधकाम व्यावसायिक संघवी डेव्हलपर्सचे नगरसेवक संजय संघवी, देवराज बिल्डर्सचे विक्रांत तांबे यांनी कॅशलेस व्यवहाराला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. फ्लॅट बुंकिंगसाठी ग्राहकांना चलनटंचाईची झळ बसू नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.