बारामती : बारामती शहरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी होत असलेला टोल आकारणीचा जाच आता बंद होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील दुहेरी टोल आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. बारामतीत दुहेरी टोल आकारणीवरून विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. दुहेरी टोल आकारणीच्या बाबत ‘लोकमत’ने उठविलेल्या आवाजाला यश आले.
रिंगरोडच्या (बाह्य वळण) रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बारामतीकरांनी दुहेरी टोल आकारणीला विरोध केला होता. त्याची दखल घेऊन जाहीर भाषणात माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी तत्कालीन रस्ते विकासमंत्री अनिल देशमुख यांना दुहेरी टोल आकारणी रद्द करावी, अशी सूचना केली. 2क्क्3 मध्ये केलेल्या सूचनेची अंमलबजावणी 2क्14 मध्ये तब्बल 11 वर्षानी होत आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. काही रस्त्यांची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली. सर्वमिळून साधारणत: साडेबारा किलोमीटर रस्त्यासाठी दुहेरी टोल आकारणी केली जात होती.
टोलवसुलीचा पहिल्या कंपनीशी करार संपल्यानंतर 2क्3क् र्पयत जवळपास 19 वर्षे 8 महिने टोल आकारणीचा करार म्हैसकर यांच्या ‘मुंबई इन्ट्री पॉईन्ट’ या कंपनीशी करण्यात आला. त्यांनी बारामती टोलवेज प्रा. लि. कंपनी स्थापन केली. रिंगरोड विकसित करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाला कचरा डेपोची 22 एकर जागा देण्यात आली. या भूखंडाचेदेखील परस्पर हस्तांतरण करण्यात आले होते. तसेच, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता मुंबईतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून या भूखंडावर 6क् कोटी रुपये कर्ज घेतले आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास बाब म्हणून बारामतीतील दुहेरी टोल आकारणी रद्द करण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता बारामतीत एकदा टोल आकारणी झाल्यावर तीन तास पुन्हा टोल आकारणी होणार नाही. 1 जुलैपासून दुहेरी टोल आकारणी रद्द होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.
निवडणुकीच्या काळातदेखील दुहेरी टोल आकारणीचा मुद्दा गाजला होता. त्यामुळे खास बाब म्हणून पवार यांनी बारामतीच्या टोल आकारणीचा विषय गांभीर्याने घेतला.
दुहेरी टोल आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी ‘लोकमत’ने केलेल्या जनजागृतीचे कौतुक केले. ‘दुहेरी टोल आकारणी आता बास’ या मुद्दय़ावर ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. कर्ज काढण्याचा बेबनाव उघड केला. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन बारामतीला दुहेरी टोल आकारणीतून मुक्त करण्यात आले आहे. आगामी काही महिन्यांत संपूर्ण टोलमुक्ती होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी बारामती नगरपालिका ठराव करणार आहे. दुहेरी टोल आकारणी रद्द केल्यामुळे येणारा आर्थिक बोजा राज्य शासन सहन करणार असल्याचे सांगण्यात आले.
4याबाबत ‘लोकमत’ने ‘टोलची टोलवा टोलवी’ अशी वृत्तमालिका प्रसिद्ध करून आवाज उठवला. त्यानंतर बारामतीकरांनी दुहेरी टोल आकारणीला विरोध वाढविला. राज्यातील टोलला राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला.
4त्यातच कोल्हापूरमध्ये टोल आकारणीचा प्रश्न पेटला. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचाच स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन बारामतीतील टोल बंद करण्याची मागणी केली.
4त्यामुळे दुहेरी टोल आकारणी बंद होणार, हे निश्चित झाले होते. मागच्या महिन्यात राज्यातील 62 टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.