बारामती : दिवाळी सण, आनंदाचा, उत्साहाचा असतो. मात्र, अनेकांना त्यांच्या परिस्थितीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे हा उत्सव देखील काहींना साजरा करता येत नाहीत. त्यामुळेच बारामतीच्या काही तरूणांनी मिळून वंचीताच्या दिवाळीसाठी ‘दान दिवसा’चे आयोजन केले. त्याला बारामतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘गुंज’ या संस्थेमार्फत दानातून मिळालेली कपडे, वस्तू वंचितांना देण्याचा आशादायी उपक्रम राबविण्यात आला. जवळपास १५ टन कपडे संकलीत झाली.या उपक्रमाचे अनेकांनी कौतूक केले. बारामतीच्या अजिंक्य परिवार या संस्थेच्या ३५ हून अधिक तरूणांनी एकत्र येऊन हा अभिनव उपक्रम राबविला. समाजातील गरजवंताच्या घरी देखील दिवाळीचा आनंद भरावा यासाठी अजिंक्य परिवारच्या कार्यकर्त्यांनी बारामतीकरांना कपडे दान करण्याचे आवाहन केले होते. कपडे, खेळणी, चादरी, ब्लँकेटस्, पुस्तके, चपला असे दोन ट्रक साहित्य यावेळी जमा करण्यात आले. गरजवंताचा स्वाभिमान जपन्यासाठी त्याला हे कपडे फुकटात न देता त्याच्याकडून झाड लावण्यासाठी किमान एक खड्डा तरी खोदून घेतला जातो. त्यामुळे या वंचितांच्या मनात देखील नकारात्मक भावना राहू नये याची काळजी घेतली जाते. हा उपक्रम राबवण्यासाठी करण वाघोलीकर, सतपाल गावडे, सोमनाथ शेटे, अजित लव्हे, सुजित कोरे, राजेश वाघमारे, दादासाहेब आव्हाड, मंदार कळसकर, मोहन कचरे, संदीप लव्हे, शैलेश स्वामी, निकिता गायकवाड, ऐश्वर्या शिंदे, ईशा लव्हे, दत्तात्रय चव्हाण, जय मदने, अक्षय इंगुले, सचिन बोधे, निलेश गादीया, प्रताप आटोळे, संतोष लालबिगे, अक्षय नारकर यांनी परिश्रम घेतले.
वंचितांच्या दिवाळीसाठी सरसावले बारामतीकर
By admin | Updated: October 28, 2016 04:29 IST