शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बारामती आठवडे बाजार असतानाही शेतकरी संपावर

By admin | Updated: June 2, 2017 01:41 IST

बारामती तालुक्यांत आज शेतकरी संपाचा चांगला परिणाम जाणवला. दूध रस्त्यावर ओतले. आठवडे बाजार बंद पाडले. मात्र,

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती तालुक्यांत आज शेतकरी संपाचा चांगला परिणाम जाणवला. दूध रस्त्यावर ओतले. आठवडे बाजार बंद पाडले. मात्र, कोणताही अनुचित प्रकार यादरम्यान घडला नाही. संपाचा परिणाम उद्यापासून जाणवण्यास सुरुवात होईल. बारामतीत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्या टोलनाक्यांवरच रोखण्यात आल्या. विविध शेतकरी संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला. राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची झळ बारामतीच्या बाजारालादेखील बसली. आज गुरुवार आठवडे बाजार असतानादेखील संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी जळोची येथील उपबाजारातील लिलाव आज सकाळी बंद पाडले, तर बाजार समितीच्या आवाराला कुलूप ठोकले. व्यापारी, आडते व विक्रेत्यांनी या संपाला पाठिंबा देत येणाऱ्या बुधवारपर्यंत बाजार समितीतील सर्व लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.याचदरम्यान किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्या गणेश मंडईतील भाजीपाला विक्रीला शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, किरकोळ विक्रेत्यांनी अगोदरच माल खरेदी केला होता. या मालाची विक्री आज झाल्यानंतर शुक्रवारपासून बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवार हा बारामतीचा आठवडे बाजार असतो. त्यामुळे भाजीपाल्याची आवक आज तुलनेने जास्त असते. मात्र काल संध्याकाळी बारामती व इंदापूर तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका होऊन संपाची तयारी झाली. त्यामध्ये ठरलेल्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी आज भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जायचे नाही व कोणी आल्यास लिलाव होऊ द्यायचे नाहीत असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज सकाळी सहा वाजताच शेतकरी जळोची येथील बारामती बाजार समितीच्या उपबाजारात दाखल झाले. त्यांनी लिलाव पुकारण्यास सुरुवात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आवाहन करीत लिलाव बंद ठेवण्याची सूचना केली. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी तरीही लिलाव सुरू झाल्याचे समजताच आक्रमक शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, राजेंद्र गावडे, बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, संचालक सुनील पवार, प्रताप सातव, सचिव अरविंद जगताप, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक सुधीर पानसरे, शिवसेनेचे सतीश काटे, राष्ट्रवादीचे जितेंद्र काटे, शीतल काटे, बारामती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे, अविनाश काळकुटे, विजयसिंह बाबर आदींसह काही सरपंच व शेतकरी या वेळी उपस्थित होते.