शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या साखरेने हवामान तज्ज्ञांचे तोंड गोड! शरद पवारांनी पाळला शब्द, अंदाज अचूक ठरल्याने वाटली साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:46 IST

हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागातील अधिका-यांना बुधवारी दिली.

पुणे : हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागातील अधिका-यांना बुधवारी दिली. तसेच, काही अधिकाºयांचे तोंडदेखील गोड करण्यात आले.बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात खा. पवार यांनी हवामान विभागाच्या अंदाजावर उपरोधिक टीका केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यात सर्वदूर पाऊस होऊन बळीराजा सुखावला. त्यामुळे पवार यांनी आपल्या वक्तव्याची आठवण ठेवत, कार्यकर्त्यांकरवी माळेगाव साखर कारखान्यातील ‘बारामतीची साखर’ अशी अक्षरे कोरलेली ५० किलो साखरेची गोणी पुण्यातील हवामान विभागात पाठवून दिली.पुणे वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ पी. के. नंदनकर, डॉ. ए. के. श्रीवास्तव यांना कार्यकर्त्यांनी साखर खाऊ घातली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेता चेतन तुपे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, दिलीप बराटे, रवींद्र माळवदकर, या वेळी उपस्थित होत्या. काकडे म्हणाले, हवामान खात्याचा अवमान करण्याचा पवार यांचा हेतू नव्हता. उलट यापूर्वी कृषी विभागाचे मंत्री असताना त्यांनी या खात्याला मदतच केली आहे. खात्याच्या कामगिरीचे कौतुक केले.