शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एसटी आगाराची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Updated: June 1, 2017 01:35 IST

शहरातील सतत वर्दळ असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेची हमी नाही. एकच पोलीस कर्मचारी या स्थानकात

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरातील सतत वर्दळ असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेची हमी नाही. एकच पोलीस कर्मचारी या स्थानकात बंदोबस्ताला असतो. त्यामुळे गर्दुल्यांसह फिरस्त्यांनी प्रवाशांना बसण्यासाठी केलेल्या आसनांवर पडी मारलेली असते. या बसस्थानकात मागील काही वर्षांपासून प्रवाशांचे मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर लग्न समारंभाला जाणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार देखील सतत घडत असतात. सीसीटिव्ही कॅमेरा फक्त दिखाव्यासाठी बसविले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दररोज ३० ते ४० हजार प्रवाशांची रेलचेल या बसस्थानकातून असते. परंतु, बारामती एसटी बसस्थानकाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. अन्य समस्या आहेतच. त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलामुलींचे मोबाईल चोरीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. स्थानकात ठिय्या मांडून बसलेल्या गर्दुल्यांना हुसकावून लावण्याचे काम आगार व्यवस्थापकाचे आहे. परंतु, पोलिसांवर जबाबदारी ढकलून दिले जाते. वास्तविक या ठिकाणी पोलीस चौकीच उभारली जावी. त्याठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांना हेरून लुटण्याचे प्रमाण वाढत असताना बसस्थानक प्रशासन पोलीस यंत्रणा देखील गाफील आहे. या ठिकाणी एकट्या प्रवाशाला गाठून भरदिवसा लुटण्याचे प्रकार देखील घडतात. काही वेळा रात्रीच्या वेळी गाड्या नसल्याने मुक्कामी असणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितेची हमी नाही. त्यांना देखील लुबाडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे एसटी बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठवड्याभरात या बसस्थानकातून महिलांचे दागिने चोरून जाण्याचे प्रमाण वाढले. बारामती शहरातील बसस्थानकातील सुरक्षायंत्रणा नियोजना अभावी निरर्थक ठरत आहे. बाहेरगावी निघालेल्या विवाहितेचे ८० हजार रुपयांचे दागिने बसस्थानकात चोरुन नेण्यात आले. सारीका यशवंत जाधव (रा. सिसोदीया हॉस्पिटल समोर, बारामती) यांनी या प्रकरणी शहर पोलीसांत फिर्याद दिली आहे. बारामती बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करताना त्यांच्या पर्समधून चार तोळे वजनाची मोहनमाळ चोरट्याने चोरली. बसमध्ये बसल्यानंतर पर्स उघडी दिसल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. बसस्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरीचे प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित होत नाही. त्यामध्ये स्पष्ट घटना चित्रित होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सीसीटीव्हीची दिशा बदलण्याची गरज आहे. घटना चित्रित होतील अशा कोनातून सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे, असे या स्थानकाच्या अधिकाऱ्यांनीच सांगितले. वास्तविक या घटना घडत असताना त्यांच्याकडूनच सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या दिशा बदलण्याची गरज आहे. मुक्ती ग्रुप या संस्थेने सीसीटिव्ही कॅमेरे बसविले. पुढची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने भरदिवसा देखील दागिने लंपास होण्याचे प्रकार घडतात. मात्र, पोलिसांना हातावर हात मारून बसण्याशिवाय पर्याय नसतो. नो पार्किंग झोनमध्येच पार्किंग करण्यासाठी गर्दी बारामती बसस्थानकात प्रवाशांना पार्किंगसाठी १ हजार स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, नो पार्किंग झोनमध्येच पार्किंग करण्यासाठी गर्दी होत आहे. त्या प्रयत्नातून अनेक प्रवाशी थेट एसटी फलाटाजवळ पोहोचतात. प्रवाशांना अपघाताचा धोका आहे. नो पार्किंग झोनमधील प्रवाशांबाबत पोलिसांना कळवुन देखील कारवाई होत नाही, असे आगारप्रमुखांनी सांगितले.