शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भंगाराची दुकाने आगीत खाक

By admin | Updated: December 7, 2015 00:16 IST

बारामती शहरात सिनेमा रस्त्यालगत असणाऱ्या भंगाराच्या दुकानांना शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत दोन्ही दुकानांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

बारामती : बारामती शहरात सिनेमा रस्त्यालगत असणाऱ्या भंगाराच्या दुकानांना शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत दोन्ही दुकानांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लगतच्या इमारती, दुकानांचे काही प्रमाणात नुकसान झाले. आग वेळीच आटोक्यात आल्याने अनार्थ टळला. भाऊसाहेब माणिक मांढरे यांच्या अनिता स्कॅ्रप सेंटर, झुंबराबाई किसन दिवटे यांच्या स्क्रॅप सेंटरला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत मांढरे यांचे अंदाजे ९ ते १० लाख रुपये तर दिवटे यांचे ४ ते ५ लाख रुपये नुकसान झाले आहे. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. फर्निचर, भंगार साहित्य गोळा करण्यासाठी गाडे, प्लॅस्टिक, केबल आदी साहित्य जळून खाक झाले आहे.छत्रपती कारखाना, बारामती नगरपरिषद, माळेगाव कारखाना, बारामती एमआयडीसीसह विविध ठिकाणचे अग्निशमन दल, वाहने या ठिकाणी आग विझविण्यासाठी पोहोचली. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा मोठा अनर्थ ओढविण्याची भीती होती. या आगीच्या झळांमुळे आसपासच्या इमारतींमधील पाईप जळून खाक झाले. तसेच, येथील एका दुकानाच्या काचा फुटल्या. मध्यरात्री अचानक लागलेली आगीची घटना समजल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यावसायिक मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल ओ. के. सिताप करीत आहेत. (प्रतिनिधी)