शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकर तापाने फणफणले!

By admin | Updated: July 26, 2016 05:22 IST

वातावरणातील बदलामुळे बारामती शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच गर्दी दिसते. रुई ग्रामीण

बारामती : वातावरणातील बदलामुळे बारामती शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच गर्दी दिसते. रुई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेले चार रुग्ण डेंगीसदृश आढळून आले होते. मात्र, तपासणीनंतर विषाणूजन्य ताप असल्याचे निदर्शनास आले. ‘फ्लू’च्या तापाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तातडीने टॅमी फ्लूच्या गोळ्या सुरू केल्या जातात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.रिमझिम पावसामुळे खाचखळग्यात, अडगळीच्या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढते. मात्र, नगरपालिका, आरोग्य विभाग, मलेरिया खात्याच्या वतीने जनजागृती केली जात असल्यामुळे डेंगीच्या डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत झाली आहे. मलेरिया विभागाच्या वतीने शहर, तालुक्यातील टायर दुरुस्ती दुकान, नारळ विक्रीसह अन्य दुकानदारांना पाण्याचा साठा वाढू नये, यासाठी नोटिसा दिल्या आहेत. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे या उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर गप्पी मासे साठलेल्या पाण्यात सोडण्यात येत आहेत. परंतु, मागील आठ ते दहा दिवसांत विषाणूजन्य तापाने रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात साधारणत: दररोज १०० ते १५० रुग्णांची वाढ झाली आहे. बाह्यरुग्ण तपासणीसाठी दररोज ५०० ते ५५० रुग्ण येतात. बहुतेक रुग्ण थंडी तापाने त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)डेंगीसदृश रुग्णांवर तातडीने उपचार...रुई ग्रामीण रुग्णालयात डेंगीसदृश ४ रुग्ण आढळून आले होते. त्यांचे पुढील तपासणीसाठी पुण्याला नमुने पाठविण्यात आले. मात्र, विषाणूजन्य ताप असल्याचे निष्पन्न झाले. हे चार रुग्ण कटफळ, तांदूळवाडी, जळोची या भागातील होते. त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार झाल्यानंतर ठणठणीत झाले आहेत. ४ रुग्णांना फ्ल्यूचा त्रास होता. आता फ्ल्यूने त्रस्त असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्ल्यूचा आजार बळावू नये, यासाठी टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या ४८ तासांच्या आत सुरू केल्या जातात. रुग्णालयात २५० ते ३०० बाह्यरुग्णांची तपासणी होते. सध्या २० ते २५ रुग्ण विषाणूजन्य तापाने त्रस्त आहेत. शासकीय औषधांचा साठा मुबलक असल्यामुळे उपचारात अडचण येत नाहीत, असे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दराडे यांनी सांगितले. शहरात धूरफवारणीसरकारी दवाखाने, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबरोबरच शहरातील खासगी रुग्णालयात तापाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंध आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत. बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ६ यंत्रांद्वारे धूरफवारणी सुरू केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गाजरगवताचे निर्मूलनदेखील केले जात आहे. जंतूनाशक पावडरचा वापर अडगळीच्या ठिकाणी केला आहे. त्यामुळे डासांची संख्या आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. मलेरियाच्या रुग्णांवर उपचार सुरू...मलेरिया विभागाच्या वतीने शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजाराबरोबरच मलेरिया अथवा इतर गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांची शासकीय तसेच खासगी हॉस्पिटलमधून माहिती घेतली जात आहे. बारामतीच्या खासगी रुग्णालयात गुणवडी आणि ढेकळवाडी या गावातील दोन रुग्णांना ‘मलेरिया’चा त्रास होत आहे. ते रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बारामती शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये इंदापूर, निमगाव केतकीसह अन्य परिसरातील रुग्ण उपचार घेत असल्याचे या विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात आज जवळपास ५२५ बाह्यरुग्णांनी उपचार घेतले. दैनंदिन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ३०० ते ३२५ असते. विषाणूजन्य तापाच्या आजारामुळे रुग्णांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.