शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एमआयडीसीचा प्रश्नकायमस्वरूपी मार्गी लागणार

By admin | Updated: April 26, 2016 01:38 IST

येथील एमआयडीसी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यासाठी ७ मे पर्यंत नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल

बारामती : येथील एमआयडीसी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यासाठी ७ मे पर्यंत नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यातून पाणीप्रश्न सुरळीत होईल. पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असे आश्वासन एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता व्ही. के. साबळे यांनी दिले.बारामती येथे एमआयडीसी विश्रामगृहात बारामती चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी, उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत साबळे बोलत होते. या वेळी साबळे म्हणाले, की येथील पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल. नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर एमआयडीसीला प्रतिदिन ८ ते १० दशलक्ष लिटर पाणी मिळेल. जलवाहिन्या फोडून पाणी चोरणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात येइल. येथील रहिवाशांनादेखील पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी ‘व्हॉल्व्ह’ बसविण्यात येतील. पाणीचोरीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या. या वेळी चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे म्हणाले, की पाणी दोन तास पुरेशा दाबाने सोडावे. कमी दाबाने पाण्याची समस्या विशेषत: चढाच्या भागात असते. चढावर असलेल्या भागांना पाणी येत नाही. एमआयडीसी परिसरातील झाडे पाण्याअभावी जळण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याची सोय करावी. या वेळी चेंबरचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, बापू बाबरे, राजाभाऊ साळुंके, नरेश तुपे, कृष्णा ताटे, चंद्रकांत नलवडे यांच्यासह एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ऐ. के. आगवणे, उपअभियंता विजय पेटकर, कनिष्ठ अभियंता विलास राणे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)