शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती ते मध्य प्रदेश पिस्तूल कनेक्शनचा गुन्हेशोधपथकाकडून उलघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

-- सांगवी : बारामतीच्या गुन्हेशोधपथकाने बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणा-या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केल्याबरोबरच आता हाती आणखी धागेदोरे ...

--

सांगवी : बारामतीच्या गुन्हेशोधपथकाने बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणा-या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केल्याबरोबरच आता हाती आणखी धागेदोरे लागताच क्षणी पिस्तूल पुरवणाऱ्या म्होरक्यासह बारामती तालुका गुन्हेशोध पथकाने तपासादरम्यान ५ जणांना अटक करत त्यांचाकडून एकूण ५ पिस्तूल व १० राउंड हस्तगत केली. गुन्हेशोध पथकाने विविध गुन्हे दाखल करत आज अखेर ११ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १२ पिस्तूलसह २० राऊंड हस्तगत केले आहेत. तर यापूर्वीच मध्य प्रदेशमधून गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणाऱ्या म्होरक्यालादेखील गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेतले आहे.

हनुमंत अशोक गोलार (वय २२, रा. जवळवाडी, खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अल्ताफ सज्जद पठाण (वय ३०, रा. नाईकवाडी मोहल्ला, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), संतोष प्रभाकर कौटुंबे, (वय ३८, रा. मारवाड गल्ली, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), जफर अन्सार इनामदार (वय २८, नाईकवाडी मोहल्ला, ता. शेवगाव, जि. अ. नगर), जावेद मुनीर सय्यद (वय २२, आखेगाव रोड, भापकर वस्ती, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुन्हेशोध पथकाने लागोपाठ केलेल्या धडक कारवाईनंतर आता गुन्हेगारी जगतात खळबळ उडू लागली आहे.

मागील आठवड्यात बारामतीत जेवणाच्या बिलावरून हॉटेल चालकाला झालेल्या मारहाणीतून अनोळखी इसमांवर जबरी चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पिस्तूल पुरवणाऱ्या गुन्हेगारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानुसार परराज्यातून बेकायदेशीररीत्या पिस्तूल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणाऱ्या रॅकेटचा सुगावा लागताच बारामतीत पर्दाफाश करून गुन्हे शोधपथकाने आदिनाथ ईश्वर गिरमे (वय २१, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे), विजय रामदास कराड (वय २०, रा. टेंबुर्णी, ता. शिरूर, जि. बीड), अमोल रमेश गर्जे (वय २२, रा. शिरसठवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर ) ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ७ पिस्तूलसह १० जिवंत काडतुसे असा एकूण सव्वादोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्दर्शनाखाली बारामती तालुका गुन्हेशोधपथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादा ठोंबरे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे, दत्तात्रय मदने यांनी ही कारवाई केली आहे.