शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, पुणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रात अद्याप अपेक्षित प्रमाणात कोरोनाचा धोका कमी झाला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुणे जिल्ह्यात आजही दररोज साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये जिल्ह्यात बारामती, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावे व सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी केली व नियमांचे उल्लंघन केल्यास तिसऱ्या लाटेला लवकरच निमंत्रण देऊ, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि सक्रिय रुग्ण बारामती आणि जुन्नर तालुक्यात आहेत. तर जिल्ह्यात आजही ९१ गावे कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव आणि दौंड या तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावांचा समावेश आहे. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक हॉटस्पॉट गावे असलेल्या खेड आणि मावळ व भोर आणि वेल्हा आज एक ही गाव हॉटस्पॉटमध्ये नाही.

जिल्ह्यात बारामती तालुक्यात तब्बल ९४० सक्रिय रुग्ण असून ६८० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर जुन्नर तालुक्यात ५२३ कोरोनाबाधित रुग्ण व क्रियाशील रुग्णांची संख्या ७५१ च्या घरात गेली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हद्दीत सर्वाधिक ६६ क्रियाशील कोरोना रुग्ण आहेत. घोडेगावपाठोपाठ याच तालुक्यातील मंचर येथे ५७ तर, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ५४ क्रियाशील कोरोना रुग्ण असल्याचे दिसून आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून हे उघड झाले आहे. जिल्ह्यातील एकूण हॉटस्पॉट गावांपैकी सर्वाधिक २५ गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. जुन्नरपाठोपाठ बारामती तालुक्यातील १५, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी बारा आणि दौंड तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे.

----

जिल्ह्यात सर्वाधिक हॉटस्पॉट तालुके व गावांची संख्या

जुन्नर २५, बारामती १५, इंदापूर १२, आंबेगाव १२, दौंड १०, शिरूर ७, हवेली ६, पुरंदर ३, मुळशी १ , एकूण ९१

-----------