शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील शेतकरी पुतळा उद्ध्वस्त

By admin | Updated: February 10, 2015 01:19 IST

बारामती नगरपालिकेच्या जागेतील पाण्याच्या टाकीचे स्थलांतर करून जागा बळकाविल्यानंतर ४० वर्षांपूर्वी लायन्स क्लबने

बारामती : बारामती नगरपालिकेच्या जागेतील पाण्याच्या टाकीचे स्थलांतर करून जागा बळकाविल्यानंतर ४० वर्षांपूर्वी लायन्स क्लबने पालिकेच्या जागेत उभारलेल्या उद्यानातील शेतकरी पुतळादेखील तोडून टाकला आहे. ही पुतळ्याची जागादेखील बळकाविणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी, हा पुतळा पाडून त्याच जागी दुसरा पुतळा उभारणार असल्यामुळे पाडला, असे सांगितले. मात्र, रातोरात पुतळा पाडल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या बारामतीतच शेतकरी पुतळा उद्ध्वस्त केल्याने नगरपालिकेतील मनमानी कारभाराचा प्रकार पुन्हा पुढे आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने अडथळा ठरलेला हा पुतळा पाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सन १९७१ मध्ये लायन्स क्लबने शेतकरी उद्यानाची निर्मिती केली होती. या ठिकाणी नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे. तसेच पाटबंधारे खात्याचीदेखील जागा आहे. पाटबंधाऱ्याच्या जागेवर नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. हे नाट्यगृह बेकायदेशीर बांधले आहे. या प्रकारची जनहित याचिका २००१ मध्ये अ‍ॅड. श्याम पोटरे यांनी दाखल केली आहे. २ वर्षांपूर्वी नगरपालिकेने त्याच परिसरात नटराज नाट्यगृहाच्या लगतच जुनी पाण्याची टाकी होती. ती टाकी पाडून नव्याने उभारण्याचा ठराव करण्यात आला. टाकी पाडण्यात आली. टाकी तेथून स्थलांतरित करण्यात आली. सध्या ही जागादेखील याच मंडळाकडून वापरली जात आहे. याच परिसरात नगरपालिकेच्या उद्यान विभाग, अग्निशमन विभागासह इतर खात्याच्या गाड्या लावण्यात येतात. त्यांना जागा कमी पडत होती. पाण्याची टाकी पाडल्यानंतर या जागेचा वापर करणे नगरपालिकेला शक्य होईल. पण असे असताना टाकी पाडल्यानंतर मोकळी झालेली जागादेखील बळकावण्यात आली आहे. नगरपालिकेच्या गाड्या लावण्यासाठी शाळेच्या खेळाच्या मैदानाचा वापर पालिकेला करावा लागत आहे. १४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून उभारलेला शेतकरी पुतळा न्यायालयाचा आदेश डावलत तोडण्यात आला आहे. या प्रकाराला नगरपालिका प्रशासन, पदाधिकारीदेखील हतबल झाले आहेत. जनहित याचिकेवर सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच हा प्रकार झाला आहे. पुतळ्याच्या परिसरातच नाट्यगृह आहे. मागील ४० ते ४२ वर्षांपासून बारामतीकरांचे आकर्षण ठरलेले शेतकरी उद्यान नाट्यगृहामुळे उद्ध्वस्त झाले. उसाची मोळी घेतलेला शेतकरी आता इतिहासजमा झाला आहे. (प्रतिनिधी)