शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

By admin | Updated: November 5, 2014 05:42 IST

बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो.

बारामती : शेतक-यांमध्ये पाणी व्यवस्थापनाबाबत जागृती होण्यासाठी तसेच ओढे, नाले यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर हंगामी पिकांसाठी करता यावा यासाठी कृषी विभागामार्फत ‘वनराई’बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत. बारामती तालुक्यामध्ये २४० ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १९० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील सुपे, खामगळवाडी, लोणी भापकर आदी कृषी सज्जांमध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांनी वनराई बंधाऱ्यांची निमिर्ती केली आहे, अशी माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो. बारामती तालुक्यातील जिरायती भागाला कायमच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे या परिसरात जेवढा पाऊस पडतो. त्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पावसाच्या पाण्याचा शेवटचा थेंब सुध्दा जमिनीत मुरवावा, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी हंगामी भाजीपाल्यासारखी पिके घेऊ शकतात. या वनराई बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)