शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महिला विभागात बलाढ्य बारामती चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:25 IST

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व बाणेरच्या सतेज संघातर्फे आयोजित कबड्डी लीगमध्ये रविवारी बलाढ्य बारामती संघाने महिला गटातून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व बाणेरच्या सतेज संघातर्फे आयोजित कबड्डी लीगमध्ये रविवारी बलाढ्य बारामती संघाने महिला गटातून विजेतेदाला गवसणी घातली. पुरुष गटामध्ये लय भारी चिंपरी-चिंचवड संघाने विजेतेपदाचा मान मिळविला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. महिला गटामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बारामती संघाने वेगवान पुणे संघावर २२-२१ असा निसटता विजय मिळवत बाजी मारली. मध्यंतराला बारामतीचा संघ ७-९ ने माघारला होता. नंतर मात्र या संघाच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ करीत सामना फिरविला. यात निर्णायक क्षणी मोलाचे योगदान दिले ते स्नेहा बिबवेने. तिने सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना एकाच चढाईत पुणे संघाच्या अंजली मुळे व कोमल गुजरला बाद करीत दोन गुण मिळविले आणि निकाल बारामतीच्या बाजूने झुकविला. याआधी सामना २०-२० ने बरोबरीत होता. विजेत्या बारामती संघातर्फे श्रद्धा चव्हाणने ९, स्नेहा बिबवेने २ गुण मिळविले. त्यांना धनश्री सणस हिने ६ पकडी घेत चांगली साथ दिली. पुण्याची कर्णधार दीक्षा जोरी हिने ८ तर, आदिती जाधवने ७ गुण घेत प्रतिकार केला. कोमल गुजरने २ पकडी घेतल्या. मध्यंतरापूर्वी पुणे संघाकडे दोन गुणांची आघाडी असूनही अखेरच्या मिनिटाला सामन्यावरील पकड गमावल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुष विभागात पिंपरी-चिंचवड संघाने अंतिम फेरीत छावा पुरंदर संघावर ३८-२८ ने सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मध्यंतराला विजेता संघ १३-१५ ने मागे होता. मात्र त्यानंतर विनीत कालेकरने केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर या संघाने जोरदार मुसंडी मारत विजेतेपद प्राप्त केले. विनितने २ बोनस, ३ पकडींसह १२ गुण मिळवित आपल्या संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. त्याला प्रमोद घुले याने ४ गुण मिळवून आणि प्रवीण शिंदेने ४ पकडी घेत मोलाची साथ दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवडने पुरंदर संघावर २ लोण चढवले. तत्पूर्वी, सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत पुरंदरने पिंपरी-चिंचवडवर लोण लावला. मध्यंतरापर्यंत अटीतटीची झुंज देणाऱ्या पुरंदरच्या खेळाडूंना नंतर मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पुरंदरच्या विवेक घुले याने १७ गुण मिळविले. ओंकार जगताप याने २ गुणांसह २ पकडी घेत ४ गुण मिळविले, तर निखिल ससार याने ३ पकडी घेत चांगला प्रतिकार केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष संग्राम कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा कड, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष, तसेच स्पर्धेचे मुख्य संयोजक नगरसेवक बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर नलावडे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले, राष्ट्रीय खेळाडू वासंती बोरडे, विजया सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, रूपाली दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निकाल : अंतिम फेरी महिला गट : बलाढ्य बारामती : २२ (श्रद्धा चव्हाण ९, धनश्री सणस ६, स्नेहा बिबवे २) विवि वेगवान पुणे : २१ (दीक्षा जोरी ८, अदिती जाधव ७, कोमल गुजर २).पुरुष गट : लय भारी पिंपरी-चिंचवड : ३८ (विनीत कालेकर १२, प्रमोद घुले ४, प्रवीण शिंदे ४) विवि छावा पुरंदर : २८ (विवेक घुले १७, ओंकार जगताप ४, निखिल ससार ३).