शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बारामती ‘बोअर’वर!

By admin | Updated: April 5, 2016 00:54 IST

भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने बारामती शहरात देखील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

बारामती : भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने बारामती शहरात देखील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन पिण्यासाठी सोडल्यामुळे शहरात नगरपालिकेचा पाणीपुरवठा दररोज होत आहे. परंतु, वाढीव हद्दीत अद्याप जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत. त्या ठिकाणी विंधनविहिरींच्या (बोअरवेल) पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु, पाणीपातळी खालवल्याने त्याही बंद पडत आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बारामती शहरासह रुई, जळोची, बारामती ग्रामीण या उपनगरांमध्ये नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शहराच्या जुन्या हद्दीत पिण्याचे पाणी दररोज नगरपालिकेचे मिळते. परंतु, या उपनगरांमध्ये तांदूळवाडी, जळोचीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पाणी वापरण्यासाठी घेतलेल्या बोअरवेल्सच्या पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामध्ये हरिकृपानगर, कारभारीनगर, जामदार रोडसह वाढीव हद्दीतील अनेक भागांतील खासगी बोअरवेल्स देखील बंद पडल्या आहेत. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे.(प्रतिनिधी)मशिन चालकांची चंगळबोअरवेल्सचे पाणी कमी झाल्यामुळे त्याची पुन्हा खोदाई करण्यावर नागरिक भर देत आहेत. साधारणत: अडीचशे ते तीनशे फुटांपर्यंत बोअरवेल्स घेतले जातात. काही ठिकाणी तर पाचशे ते आठशे फुटांपर्यंत खोदाई केली जाते. तरी देखील भूगर्भातीलच पाण्याची पातळी खालावल्याने पाणी लागत नाही. मात्र, बोअरवेल्स खोदाई करणाऱ्या मालकांना पैसे देणे चुकत नाही. ५५ ते ७५ रुपये प्रतिफुटापर्यंत खोदाई आकारणी केली जाते. टँकरने पाणीपुरवठा अनेक भागांत केला जात आहे. त्याचबरोबर पूर्वी जिल्हा परिषदने केलेल्या हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे. त्याचबरोबर नव्याने काही ठिकाणी बोअरवेल्स खोदण्याचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याने नगरपालिका प्रशासनामार्फत पुढील कारवाई होत आहे. यात मजूरवर्ग सकाळी लवकर घराबाहेर पडत असल्यामुळे ५ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठिकठिकाणी बसवून त्यामध्ये टँकरचे पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.- विक्रांत तांबे, नगरसेवक