शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

बाप्पा मोरयाचा घोष, तरुणाईचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2015 02:25 IST

रात्रीचे ११ वाजलेले. अलका चित्रपटगृहाच्या चौकात ही गर्दी झालेली. महापालिकेच्या स्वागत कक्षात महापौर दत्तात्रय धनकवडे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थानिक नगरसेवक

पुणे : रात्रीचे ११ वाजलेले. अलका चित्रपटगृहाच्या चौकात ही गर्दी झालेली. महापालिकेच्या स्वागत कक्षात महापौर दत्तात्रय धनकवडे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थानिक नगरसेवक धनजंय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. ते सगळे आणि समोरचा जनसमुदाय सगळ्यांच्या तोंडात एकच गजर, एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!बाबू गेनू मित्र मंडळ, जिलब्या मारुती, श्रीमंत भाऊ रंगारी, कुंजीर तालीम मंडळ अशा अनेक मंडळांचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर होते. अलका चित्रपटगृह चौकात मंडळ आले, की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. महापालिकेच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा श्रीफळ देऊन गौरव केला जात होता. प्रत्येक मंडळाजवळ ढोलपथक होतेच. चौकात आले त्यांना खास वेळ दिला जात होता. त्यांनाही मग विशेष वादन करून दाखवण्याची खुमखुमी येई. त्यांच्याकडून ताशा आणि ढोलांचा तालबद्ध गजर झाला, की चौकाच्या चारी बाजूंना उभ्या असलेल्या भाविकांकडून टाळ्यांची मोठी दाद मिळत असे. अशा टाळ्या झाल्या की मग बाप्पा मोरयाचा जयघोष! अनेक मंडळं चौकातून जात होती. त्यातही एकदा कुंजीर तालीम मंडळाच्या अरेरावी करीत असलेल्या काही कार्यकर्त्यांना थोडी पोलिसी चुणूक मिळाली. झाले, चौकात येताच त्यांनी थेट स्वागत कक्षात धाव घेत महापौरांकडेच गाऱ्हाणे मांडले. तिथे आलेल्या काही उत्साही कार्यकर्त्यांकडून लगेचच थांबा, मंडळ पुढे जाणार नाही, असे ओरडून सांगण्यात आले. मात्र नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी संयमाने परिस्थिती हाताळत ध्वनिवर्धकावरून एक आवाहन केले. पोलिसांनी थोडी काळजी घ्यावी, कुंजीर तालीम मंडळाचे सगळे पैलवान कार्यकर्ते त्यांच्यावर चिडले आहेत, असे म्हणत त्यांनी सगळ्यांना खूश करून टाकले. त्यामुळे वाढू शकणारा हा प्रसंग टळला.दरम्यान, जमलेल्या सगळ्या भाविकांना प्रतीक्षा होती ती दगडूशेठ हलवाई व मंडईच्या शारदा गणेशाची. ही दोन्ही मंडळे कधी निघणार, याची विचारणा अलका चौकापासून ते थेट बेलबाग चौकापर्यंत होत होती. बरोबर साडेबारा वाजता अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश फुलांनी सजवलेल्या भव्य स्वराज्यरथातून बेलबाग चौकात अवतीर्ण झाला. या दुमजली रथावरचे फुलांचेच झेंडे, वरच्या भागातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हे सगळेच आकर्षक होते. मिरवणुकीतील ढोलपथकांनी मिरवणूक दिमाखदार केली होती. नेहमीपेक्षा थोडा लवरकरच मंडईचा गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्याने सगळे वातावरण उत्साही झाले. (प्रतिनिधी)