शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यातून बाप-लेकीची आत्महत्या

By admin | Updated: May 5, 2017 03:00 IST

ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणुकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसल्याने नैराश्यातून पिसोळी येथील

पुणे/उंंड्री : ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणुकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसल्याने नैराश्यातून पिसोळी येथील राहत्या घरी बाप-लेकीने विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांनी पाचपानी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. डॉ. किरण देवेंद्र पाटील (वय ६१, रा. किंग्स्टन एलिसिया सोसायटी, पिसोळी) आणि नियाता किरण पाटील (वय १८, रा. किंग्स्टन एलिसिया सोसायटी, पिसोळी) अशी मृत बाप-लेकींची नावे आहेत. शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, उपनिरीक्षक पावसे, गणेश कुल्लाळ, रवींद्र भोसले, रमेश राठोड, सचिन शिंदे, विजय गायकवाड, अमोल शिंदे घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा कोणीही उघडत नसल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. दरवाजा तोडल्यानंतर दोघांचे मृतदेह खुर्चीत बसलेल्या अवस्थेत आढळले. आठ दिवसांपूर्वीच दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पाटील यांचे कुटुंब मूळचे ठाण्याचे असून, काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त ते पुण्यात आले होते. एका खासगी कंपनीत काम करीत असलेले डॉ. किरण पाटील नोकरीतून निवृत्त झाले होते. मुलगी एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. (प्रतिनिधी)गुंतवणुकीतून आर्थिक फटकाआत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये ई-कॉमर्स कंपनीत पैशाची गुंतवणूक केल्याचा आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्नीने मार्च २०१५ मध्ये कौटुंबिक हिंसाचार (४९८ कलम) अंतर्गत पाटील यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे दोन वर्षांपासून ती मुंबई येथे वास्तव्यास आहे.