शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आज बँका, पोस्ट आॅफिस बंद

By admin | Updated: November 14, 2016 07:00 IST

नोटा बंद निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शासनातर्फे शनिवारी व रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या

पुणे : नोटा बंद निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शासनातर्फे शनिवारी व रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, गुरू नानक जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुटी असल्याने सोमवारी (दि.१४ ) बँका व पोस्ट आॅफिस बंद राहणार आहेत. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.काही किरकोळ घटना वगळता नागरिकांनीही कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. मात्र, सोमवारी पुणे शहरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. शासन आदेशनुसार सुटीच्या दिवशीही बँका सुरू राहिल्या.पोस्ट आॅफिस अधिकारी एफ.बी.सय्यद म्हणाले, की बँकांबरोबरच पोस्ट आॅफिस कर्मचा-यांनीही नागरिकांच्या सोईसाठी विविध ठिकाणी सेवा दिली. ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी तत्काळ सुविधा उपलब्ध करून दिली.रविवारी वायसीएम हॉस्पिटलमधील रुग्णांसाठीही पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी नोटा बदलून देण्याची व्यवस्था केली होती. गुरूनानक जयंतीनिमित्त पोस्ट आॅफिस बंद राहणार आहेत.मंगळवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सर्व पोस्ट आॅफिस सुरू होतील. आरबीआय कडून प्राप्त होणाऱ्या नोटांनुसार पोस्टाकडून नागरिकांना नोटाचे वाटप केले जाते. नोटा संपल्यानंतरच पोस्ट आॅफिस बंद केली जातात.दरम्यान, पुणे पीपल्स को-आॅप़ बँकेने शहरातील सर्व शाखा सोमवारी ग्राहकांसाठी पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सर व्यवस्थापक सदानंद दीक्षित यांनी दिली़ (प्रतिनिधी)