शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मनसेनं पकडलेले 'ते' बांगलादेशी नागरिक मनसैनिक अन् राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 20:50 IST

बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती.

ठळक मुद्देमनसेनं काल पुण्यात पकडलेले बांगलादेशी हे राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमुळे प्रचंड मनस्ताप झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती.

पुणेः मनसेनं काल पुण्यात पकडलेले बांगलादेशी हे राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमुळे प्रचंड मनस्ताप झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात ते आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात एक मोहीम राबवली होती. बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती.सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यावेळी घटनास्थळी सहकारनगर पोलीसही हजर होते. सुमारे 50 मनसे कार्यकर्ते परिसरात फिरून घरांमध्ये कागदपत्रांची मागणी आणि तपासणी करत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती असलेल्या बांगलादेशींच्या घरातही ते घुसले होते. त्यांना घरातून बाहेर काढलं. तुम्ही तुमची कागदपत्रं दाखवा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. जर एखाद्याकडे कागदपत्रे नसतील तर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्याची मागणी मनसेने केली होती. त्यानंतर त्या बांगलादेशींना पोलीस स्टेशनमध्येही घेऊन जाण्यात आलं होतं.तसेच त्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व असल्याची पोलिसांनी खातरजमा केली. त्यांच्याकडे भारताचे नागरिक असल्याचे अनेक कागदपत्रं पुराव्याच्या स्वरूपात होते.  आता त्याच स्वारगेटजवळील सहकार नगरच्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये या बांगलादेशींनी मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात आणि राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या बांगलादेशींनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही या बांगलादेशींनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. ठाण्यातील किंगकाँगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. स्थानिकांकडून याची माहिती मिळताच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी पोहोचले. त्यानंतर येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट आढळून आल्याची माहिती अविनाश  जाधव यांनी दिली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBangladeshबांगलादेश