शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नौकानयनावर बंदी

By admin | Updated: February 7, 2015 23:36 IST

परदेशी पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांची निराशा झाली़ पाटबंधारे विभागाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली़

भिगवण : पाटबंधारे विभागाने उजनी जलाशयात बोटींना परवानगी नाकारल्याने पुणे व परिसरातून परदेशी पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांची निराशा झाली़ पाटबंधारे विभागाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली़ या कारवाईमुळे पर्यटकांना निराशा होऊन परत जावे लागले़ स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे़ उजनी जलाशयाच्या परिसरात आलेल्या परदेशी पक्षी पाहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव परिसरातील नागरिकांनी नौका विहाराच्या व्यवसायातून पर्यटनाला चालना दिली आहे. पुणे शहरासह अन्य ठिकाणाहून पर्यटक सुट्टीच्या दिवशी डिकसळ पूल आणि कुंभारगाव येथे पक्षी निरीक्षणासाठी येतात. याद्वारे डिकसळ आणि कुंभारगाव येथील बऱ्याच तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता. या सर्व बोटी हाताने चालवायच्या आहेत़ पाटबंधारे खात्याची कारवाई जाचक असल्याचे गावातील तरुणांनी सांगितले. आतापर्यत उजनी धरणात चाललेल्या अनधिकृत वाळू उपशावर कारवाई न करता तसेच परप्रांतीय मच्छिमार त्यांच्यावरही कोणतीही ठोस कारवाई न करता, स्थानिक लोकांना कारवाईचा बडगा दाखवला आहे. त्यांची रोजी रोटी बंद करण्याचा डाव असल्याची शक्यता बोलून दाखवली. परप्रांतीय मच्छिमार आणि नदीकाठी असणाऱ्या कारखान्याचे प्रदूषित पाणी यामुळे सध्या उजनीच्या पाण्यात मिळणारी माशांची पैदास घटली आहे. त्यामुळे मासेमारीवर उपजिविका करणाऱ्यांना दोनवेळच्या जेवणा एवढेही पैसे मिळत नाहीत. (वार्ताहर)४यावेळी कारवाई करण्यासाठी आलेले उजनी उपसा शाखेचे पळसदेव शाखा अधिकारी पांडुरंग शिवराम गवंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपणास वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्याने अनधिकृतपणे बोटीतून पर्यटन करण्यास मनाई केल्याचे सांगितले. ४तसेच पर्यटकांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार यासाठी कारवाई केल्याचे सांगितले. तसेच वाळू उपसा होत असताना त्यावर कारवाई केली जात नाही, असे निदर्शनास आणल्यावर त्यांनी सांगितले की, आमच्या हद्दीत जर अनधिकृत वाळू उपसा चालू असल्याचे निदर्शनात आले. तर त्याची माहिती तहसीलदारांना ताबडतोब दिली जाते. तसेच अधिकृतपणे परवाना काढल्यास आमची कोणतीही कारवाई होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.