शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएएमएस’ इंटर्नशिप तीन महिनेच

By admin | Updated: March 31, 2015 05:23 IST

बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात इंटर्नशिपच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेचे ज्ञान मिळावे यासाठी सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन

पुणे : बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात इंटर्नशिपच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेचे ज्ञान मिळावे यासाठी सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) संघटनेने ६ महिन्यांचा कालावधी दिला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तो कालावधी ३ महिन्यांनी कमी केला आहे. त्यामुळे राज्यभरातील अडीच हजार विद्यार्थ्यांना ग्रामीण अत्यावश्यक सेवेचे ज्ञानच मिळणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.ग्रामीण भागात जाऊन प्रॅक्टिस करण्यास बहुतांशी एमबीबीएस डॉक्टरांचा विरोध असतो. त्यामुळे ग्रामीण भागात बहुतांशी वैद्यकीय सेवा बीएएमएसचे डॉक्टरच देतात. त्यामुळे राज्य शासनाने बीएएमएस डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची याआधीच परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीएएमएसची पदवी घेतल्यानंतर तेथे प्रॅक्टिस करण्यासाठी जाण्याअगोदर डॉक्टरांना ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची माहिती असावी, त्याचे प्रत्यक्ष ज्ञान असावे, यासाठी सीसीआयएम संघटनेने आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना शहरातील रुग्णालयांमध्ये ६ महिने आणि ग्रामीणमधील रुग्णालयांमध्ये ६ महिने इंटर्नशिप करण्याचा आदेश २०१२ मध्ये दिला होता. मात्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या नव्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सीसीआयएमने २०१० मध्ये दिलेल्या इंटर्नशिपसाठी ९ महिने शहर व ३ महिने ग्रामीण असा फॉर्म्युला राबविण्यास सुरुवात केली आहे. या जुन्या फॉर्म्युल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये जाऊन कॅज्युअल्टी, इमर्जन्सी केस हाताळण्याचा अनुभव मिळणार नाही. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होण्याची शक्यता असून, भविष्यात नोकरीच्या संधी त्यांना मिळणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सीसीआयएम संघटनेने २०१२ मध्ये नवा आदेश जारी केल्यानंतर पूर्वीचे आदेश आपोआप रद्द होतात. तरीही विद्यापीठाकडून जुन्याच आदेशाची अंमलबजावणी का होत आहे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत.