शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अलंकापुरीत रस्त्यांचा कोंडला श्वास

By admin | Updated: May 11, 2017 04:19 IST

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत बेकायदेशीरपणे होत असलेल्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्त्यांचा श्वास कोंडला जात आहे. वडगाव रस्ता, चाकण

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत बेकायदेशीरपणे होत असलेल्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्त्यांचा श्वास कोंडला जात आहे. वडगाव रस्ता, चाकण रस्ता तसेच माउली मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पार्किंगमुळे या परिसराला वाहनतळाचे रूप प्राप्त होऊ लागले आहे. परिणामी भाविकांना पायी चालतानासुद्धा नाहक त्रास सहन करून मार्गस्थ व्हावे लागत आहे. बेकायदेशीररीत्या फोफावत चाललेल्या पार्किंगवर पोलीस प्रशासनाकडून कायमस्वरूपी कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल नागरिक तसेच भाविकांकडून विचारला जात आहे.प्रदक्षिणामार्गावरून मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर महाद्वारात प्रवेशाच्याच वेळी भाविकांना येथील बेशिस्त पार्किंगचा सामना करावा लागत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रवेशमार्गावरच सुमारे शंभराहून अधिक दुचाकी वाहने बेकायदेशीररीत्या पार्किंग केली जात असल्याने भाविकांना चालताना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, मंदिरात प्रवेश करायचा कसा? असा प्रथमदर्शनी प्रश्न भाविकांना पडू लागला आहे. मंदिराबाहेरील मोकळ्या परिसरात ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला असतानाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे मंदिराचा श्वास कोंडला जाऊन परिसरात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. त्यातच दुकानदार, प्रसादविक्रेते, फेरीवाले आदींचे अतिक्रमण अधिक भर घालत आहे. त्यामुळे शेजारील रस्त्यावरून पायी ये-जा करतानाही अडचण होत आहे. बेकादेशीरपणे ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये वाहने लावलेल्या महाशयांवर पोलिसांनी नित्याने कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आळंदी विकास युवा मंचच्या वतीने संदीप नाईकरे, संजय नाईकवडी, रूपाली पानसरे, अमोल घुंडरे, गौरी भापकर, पुष्पा कुऱ्हाडे, प्रदीप गायकवाड आदींनी केली जात आहे.