भोर : बाळासाहेबांची वाघाची शिवसेना आता राहिलेली नसून ती मांजराची झालेली आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. पोम्बर्डी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत सुळे बोलत होत्या. शरद पवारांबरोबर अनेक वर्षे काम करणारे नेते पक्षाला सोडून गेले आहेत. मात्र ते ज्या पक्षात गेलेत ते शहाणपणाचे नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष जालिंधर कामथे, चंद्रकांत बाठे, रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, श्रीधर किंद्रे, दमयंती जाधव उपस्थित होते. नरेंद्र पाटील म्हणाले, की मुंबईत माथाडीत काम करीत असलेले भोर तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे उभे राहतील. (वार्ताहर)
बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही : सुप्रिया सुळे
By admin | Updated: February 20, 2017 02:03 IST