शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

कालव्यालगतचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: April 29, 2017 03:54 IST

पूर्व हवेलीतून वाहणाऱ्या नव्या मुळा-मुठा कालव्यालगतच्या तसेच बेबी कालव्यालगतच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा पाणीचोरी थांबविण्यासाठी खंडित करण्यात आला आहे.

उरुळी कांचन: पूर्व हवेलीतून वाहणाऱ्या नव्या मुळा-मुठा कालव्यालगतच्या तसेच बेबी कालव्यालगतच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा पाणीचोरी थांबविण्यासाठी खंडित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बी. व्ही. साब्दे व पाटबंधारे विभागाच्या उरुळी कांचन शाखा अभियंता शशिकांत काळे यांनी दिली. तरीही काही शेतकरी अन्य प्रकारे पाणीचोरीचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर व त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कडक कारवाई करणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन २० एप्रिल ते ५ जून २०१७ पर्यंत सोडण्यात येत असून सध्या सुमारे १६०० क्युसेक्स डिस्चार्जने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र ‘टेल टू हेड’ पाणीवाटप धोरणानुसार कालव्याच्या शेवटी असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी सर्वात आधी पाणी दिले जाणार आहे. मात्र हवेली व दौंड तालुक्यातील शेतकरीवर्गाकडून तीव्र उन्हाळ्यात पिकांना कमी पडणाऱ्या पाण्याची भूक भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कालव्याचे पाणी चोरून उचलले जात असल्याने कालव्याच्या शेवटी पाणी पोहोचत नसल्याचे कारण देत परिसरातील शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे जनावरांसाठीचा चारा, भाजीपाला व इतर पिके पंधरा दिवसांपर्यंत तग धरणे कठीण असते. त्यातच कालव्याला पाणी असूनदेखील शेतीसाठी त्याचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पाणी चोरीची प्रवृत्ती बळावत असून ते कारवाईची भीती बाळगत नसल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)