शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘बाजीराव-मस्तानी’ला विरोधाचा फार्स; पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: December 19, 2015 03:17 IST

‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबीयांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आक्षेप घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील काही

पुणे : ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबीयांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आक्षेप घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील काही चित्रपटगृहांसमोर आंदोलन केले. त्यामुळे, काही चित्रपटगृहचालकांना ‘शो’ बंद करावे लागले. परिणामी, पोलीस बंदोबस्त ठेवून चित्रपट प्रदर्शित करावा लागला. मात्र, आंदोलकांनी चित्रपटगृहासमोर लावलेले पोस्टर फाडून आंदोलन केले.भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करून, आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीही कोथरूडमधील सिटी प्राइड चित्रपटगृहात तिकिटांची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच चित्रपटगृहासमोर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. चित्रपटगृहाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे सिटी प्राइड, कोथरूडमधील शो रद्द करण्यात आले. मंगला चित्रपटगृहासमोरही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पोस्टर फाडले. बंदोबस्तात चित्रपटाचा शो प्रदर्शित करण्यात आला.युवा मोर्चा कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष रितेश वैद्य म्हणाले की, या चित्रपटामुळे मराठ्यांच्या इतिहासाचे विकृत प्रदर्शन होत असतानाच श्रद्धास्थानांची बदनामी होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. त्यामुळे सिटी प्राइडचे सर्व शो बंद पाडण्यात आले. दरम्यान, आमदार मेधा कुलकर्णी यांनी चित्रपटास विरोध नाही; पण इतिहासाचे चुकीचे चित्रीकरण वगळून मग चित्रपट प्रसिद्ध करावा, असे पत्र मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांना दिले होते. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मतदारसंघाचे अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, सरचिटणीस अमोल डांगे, कुलदीप सावळेकर, प्रकाश बालवडकर, शहर उपाध्यक्ष जयंत भावे, डॉ. संदीप बुटाला, चिटणीस प्रशांत हरसुले, नगरसेविका मोनिका मोहळ, मंदार घाटे, उदय कड, सुनील मेंगडे, सचिन फोलाने, अजय मारणे, अशोक शेलार आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.दरम्यान, सिटी प्राइड कोथरूड येथे सकाळी सात वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच अधिकारी व २९ कर्मचारी, असा मोठा फौजफाटा चित्रपटगृहाच्या बाहेर होता, असे कोथरूड पोलिसांनी सांगितले.तर मंगला चित्रपट गृहासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त होता.पुणे भाजपाने चित्रपटाचे शो रद्द करावेत, असे निवेदन दिले होते. त्यामुळे शुक्रवारी मल्टिप्लेक्समधले एकूण १० शो रद्द करण्यात आले. मात्र, उद्या (शनिवारी) एकही शो रद्द करण्यात येणार नाही. बुकिंग करूनही जे शुक्रवारी चित्रपट पाहू शकलेले नाहीत, त्यांना उद्या हा शो पाहता येणार आहे.- पुष्कराज चाफळकर, मालक सिटी प्राइड, मल्टिप्लेक्सआंदोलनाशी आमचा संबंध नाहीशहरामध्ये चित्रपटाविरोधात हिंसक मार्गांनी झालेल्या आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नाही. आमचे नाव यामध्ये विनाकारण गोवले जात आहे. गाण्यांच्या माध्यमातून इतिहासाच्या होणाऱ्या विकृतीकरणाला आमचा विरोध आहे. यातील गाणी वगळण्यात यावी, ही आमची मागणी आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट इतिहास म्हणून न पाहता मनोरंजन म्हणून पाहावे.- पुष्करसिंह पेशवा, पेशव्यांचे वंशज