मंगेश मधे, शेखर शर्मा, संजय कोरडे (सर्व रा. कैलासनगर येडगाव, ता. जुन्नर) विजय केदारी (रा. सावरगाव ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येडगाव येथील शेतकरी शरद सदाशिव नेहरकर यांच्यासह १० ते १२ शेतकऱ्यांच्या पाणी मोटर पंपच्या केबल २३ एप्रिलला चोरीला गेेल्या होत्या. त्याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल केला होता. यापूर्वी देखील येडगाव परिसरातून बऱ्याच ठिकाणी केबल चोरीचे सत्र सुरू होते.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार रमेश काठे, पोलीस नाईक धनंजय पालवे, भीमा लोंढे, पो. काॅ. केळकर, सचिन कोबल, पो. काॅ. वाघमारे या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे माहिती घेऊन मंगेश मधे, शेखर शर्मा, संजय कोरडे यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे केबल चोरी संदर्भात चौकशी केली असता त्यांनी केबल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस नाईक काका जांभळे हे करीत आहे.