शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी तरुणाचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 30, 2017 03:59 IST

लग्न होऊन सहा वर्षांच्या मुलाचा बाप असतानाही अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी २५ वर्षीय

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लग्न होऊन सहा वर्षांच्या मुलाचा बाप असतानाही अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. कुणाल बाळू लोंढे (वय २५, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे त्याचे नाव आहे. १५ वर्षीय मुलीच्या आईने याबाबत लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. रंगकामासाठी जात असल्याने लोंढे आणि त्या मुलीची ओळख झाली. त्याने या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. त्यास फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे ३० नोव्हेंबर २०१६ रोजी लोंढे याने लोणावळा येथून त्या मुलीला पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीने त्या मुलीला हिंजवडी भागात चार महिने नेऊन ठेवले होते. त्यावेळी तिच्यावर बलात्कार केला. वैद्यकीय पुराव्यावरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ती मुलगी हिंजवडी भागात होती. त्यावेळी लोंढे याचे लग्न झाले असून, त्याला सहा वर्षांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी त्या मुलीने याबाबत लोंढे याला विचारणा केली. त्यावेळी लोंढे याने तिला मारहाण केल्याचे डॉक्टरांजवळ दिलेल्या जबाबात तिने सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे जामीन मिळाल्यास लोंढे पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा, असा अ‍ॅड. बोंबटकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.