शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: April 16, 2017 03:54 IST

येथील रश्मीकांत तोरणे या युवकाच्या हत्या प्रकरणातील दोघा आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज बारामती येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. एम. राजकारणे यांनी फेटाळला.

बावडा : येथील रश्मीकांत तोरणे या युवकाच्या हत्या प्रकरणातील दोघा आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज बारामती येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. एम. राजकारणे यांनी फेटाळला.अक्षय गौतम जगधने व विनोद अरुण झेंडे अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी वकिलामार्फत जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य व आरोपींचा त्यात सहभाग असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली. तर आरोपी जगधनेच्या वतीने अ‍ॅड. धनंजय माने यांनी काम पाहिले. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. कमलाकांत तोरणे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.गुन्ह्याची हकीकत अशी, रश्मीकांत याचे दि. १५ मार्च २०१५ रोजी मोबाईलवर फोन करून बोलावून अपहरण करण्यात आले होते. स्थानिक पोलिसांनी याबाबत फिर्याद घेण्यास टाळाटाळ करून राजकीय दबावाने आरोपींना पाठबळ देत या गुन्ह्याच्या तब्बल सोळा महिने तपास केला नव्हता. तोरणे कुटुंबीयांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला. बावड्यात ऐन उन्हाळ्यात तब्बल पाच तास नागरिक व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता. तरीही स्थानिक पोलिसांनी तपास लावला नाही. अखेर कोल्हापूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर तोरणे कुटुंबीयांनी प्राणांतिक उपोषण सुरु केले. त्याची पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी तत्काळ दखल घेत इंदापूर पोलिसांकडून या गुन्ह्याच्या तपास काढून घेऊन पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अवघ्या बारा दिवसांत या खुनाला वाचा फोडली. आरोपींनी खुनाची कबुली देऊन मृतदेह पुरलेली जागा दाखवली. तेथून मृताचा सांगाडा पोलिसांनी हस्तगत केला. खुनात वापरलेला चाकूही आरोपीने काढून दिला. (वार्ताहर)- या प्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना निलंबित करण्यात आले. तर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत काळे, विलास नाळे व एका तपासी अंमलदाराची खातेनिहाय चौकशीचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.