शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी अपहार प्रकरणातील व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:10 IST

पुणे : बनावट बिलाद्वारे शासनाची फसवणूक करीत ७ कोटी २८ लाख ४० हजार रुपयांचा जीएसटी अपहार केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाचा ...

पुणे : बनावट बिलाद्वारे शासनाची फसवणूक करीत ७ कोटी २८ लाख ४० हजार रुपयांचा जीएसटी अपहार केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

संजय शेषराव गायकवाड असे जामीन फेटाळलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. गायकवाड यांनी केलेला गुन्हा देशाची आर्थिक परिस्थिती खिळखिळी करणारा आहे. त्यामुळे, जीएसटीसारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यामध्ये जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. संदीप घाटे यांनी केला. सत्र न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी तो मान्य करत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेले संजय गायकवाड यांनी सिग्मा टेकइन्फ्रा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटीडे या फर्मद्वारे बनावट बिले तयार करून भारत सरकारची फसवणूक केल्याप्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत १६ मार्च २०२१ रोजी अटक केली. येरवडा कारागृहात रवानगी केल्यानंतर याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी गायकवाड याने न्यायालयात अर्ज केला. सदर गुन्हा आरोपीने केला नाही. त्यांचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याच्या युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यास जीएसटी खात्याच्या वतीने अ‍ॅड. घाटे यांनी हरकत घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले दिले. जीएसटी आयुक्तांना या स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्याचे पूर्ण अधिकार आहे. तसेच, अटक करण्यापूर्वी मूल्यांकन करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. याप्रकरणात अ‍ॅड. श्वेता आरूडे, अ‍ॅड. श्रद्धा जाधव व अ‍ॅड. मंगेश दिवेकर यांनी काम पाहिले.