शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बारा कोटींच्या करमणूककराचा ‘बाहुबली’

By admin | Updated: June 3, 2017 02:37 IST

बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या ‘बाहुबली २’ मुळे जिल्ह्यामधून अवघ्या एकाच महिन्यात तब्बल १२ कोटी ५८ लाखांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या ‘बाहुबली २’ मुळे जिल्ह्यामधून अवघ्या एकाच महिन्यात तब्बल १२ कोटी ५८ लाखांचा करमणूक कर प्रशासनाला मिळाला आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर मिळवून देणारा बाहुबली हा आजवरचा एकमेव सिनेमा ठरला आहे. शहरातील २५ मल्टीप्लेक्स, मल्टीस्क्रिन आणि ३१ सिनेमागृहांमधून महिन्याला साधारणपणे चार कोटींच्या आसपास करमणूककर मिळतो. २८ एप्रिल रोजी बाहुबली २ हिंदी, तेलुगु सह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाचे तीनपेक्षा जास्त खेळ चालू आहे. सिनेमा येऊन एक महिना उलटल्यानंतरही तिकीटबारीवर अद्यापही बाहुबलीच ‘भाव’ खात आहे. हा सिनेमा जिल्हा प्रशासनाच्या मात्र पथ्यावर पडला असून एका महिन्यातच १२ कोटी ५८ लाखांचा करमणूककर प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. बाहुबली २ मुळे आजवरचा सर्वाधिक कर मिळाला आहे. आगामी काळात ट्यूबलाईट, रोबोसारखे बिगबजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमधूनही चांगला कर मिळण्याची शक्यता करमणूकर विभागाच्या तहसीलदार सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले.