कुरकुंभ : येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर बांधण्यात आलेले बसथांबे दोन वर्षांपासून वापराअभावी पडून राहिले आहेत. गावापासून येथे अगदीच दूर बांधण्यात आलेल्या बसथांब्यावर एसटी बस अथवा प्रवासी थांबत नाही. परिणामी, याच्या बांधण्याच्या जागेवरच सुरवातीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.कुरकुंभ येथील सेवा रस्त्यावरील एसटीची वाहतूक तुरळक प्रमाणात जरी सुरू असली तरीपण बसचालकांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण मात्र कोणाचेही असल्याचे दिसत नाही. याचा प्रत्यक्ष परिणाम येथील वाहतूक व्यवसायावर होत आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीस खतपाणी घालण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे.कुरकुंभ येथील महामार्गावर बसथांब्यासाठी नियोजन करण्यात आल्याची बातमी महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी वांरवार देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात तसे काहीच न होता बसथांबा हा गावाच्या इतका बाहेर देण्यात आला, की त्याचा उपयोग झालाच नाही. कायमस्वरूपी बसथांबा हवा.कुरकुंभ येथे औद्योगिक वसाहतीमुळे जवळपास देशातील तसेच राज्यातिल विविध ठिकाणांहून कामगार स्थित झालेले आहेत. त्यामुळे येथील प्रवासी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान रात्रीअपरात्री येणाऱ्या प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.बसचालकांवर कठोर कारवाई करासेवा रस्त्यावरून न जाता सुसाट वेगाने भराव पुलावरून जाणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. दूर जाणाऱ्या प्रवाशांचा विचार न करता बसचालक मनमानी करून निघून जातात अथवा प्रवाशांना भराव पुलावरच सोडून देतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यात वाद होताना दिसतात.
बसथांबा दोन वर्षांपासून वापराअभावी पडीक
By admin | Updated: June 18, 2015 22:45 IST