शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्याकडे पाठ, दुर्गम भागातील गाड्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:34 IST

गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी, असे शासनाचे धोरण वेल्हे तालुक्यात मात्र फोल ठरत आहे.

वेल्ह्याकडे पाठ मार्गासनी : गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी, असे शासनाचे धोरण वेल्हे तालुक्यात मात्र फोल ठरत आहे. तालुक्यात डोंगरी भागात एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे तसेच अनेक दुर्गम भागातील गाड्या महामंडळाकडून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेल्या वेल्हे तालुक्याकडे एसटी महामंडळाने पाठ फिरवली आहे. या भागातील दुर्गम भागात जाणाऱ्या गाड्या महामंडळाने बंद केलेल्या आहेत. बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने या भागातील प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. दुपारी चार वाजता शेवटची बस वेल्हे येथून सुटते. त्यानंतर वेल्हे येथून एकही बस पुण्याला जाण्यासाठी नसते. स्वारगेटवरून सायंकाळी साडेचार वाजता गाडी वेल्ह्यास असते. त्यानंतर एकही गाडी नसल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर वेल्ह्यातील शासकीय कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी तसेच पुण्याकडे जाणारे विद्यार्थी, चाकरमाने आदींची मोठी गैरसोय होत आहे.तोरणा, राजगड, मढेघाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत आहे. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातून एसटी चार वाजता निघून जाते. याबाबत स्वारगेट आगार व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पुणे शहरात तसेच वेळू, शिवापूर, शिरवळ भागातून वेल्हेकडे येणारे चाकरमाने नियमित प्रवास करीत आहेत. परंतु शेवटची गाडी बंद झाल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. तालुक्यातील मुक्कामी हारपूड, वांगणी, मंजाई आसनी, कोदापूर, निवी, भट्टी आदी तर मागील एक वर्षापासून बंदच केलेल्या आहेत. या तर पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी वेल्हेकर करीत आहेत.