सध्या ते रायपूर एनआयटीमध्ये पीएच.डी. करीत आहेत. क्षीरसागर यांनी केलेल्या संशोधनामुळे दिव्यांग तसेच ब्रेन हॅमरेज, कोमातील रुग्णांच्या विचार प्रक्रिया, शारीरिक गरजा इत्यादी मेंदूतील सिग्नल्स हे सेन्सरच्या साहाय्याने डिस्प्ले होऊ शकतात, हे अत्यंत क्रांतिकारक संशोधन आहे. यामध्ये क्षीरसागर यांना डॉ. नरेंद्र लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. ते मुळचे इंदापूर येथील असून त्यांनी इयता १२ वी पर्यंतचे शिक्षण श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथे पूर्ण केले आहे. पुढे उपकरणे व नियंत्रण शाखेची अभियांत्रिकी पदवी पुण्यातील एआयएसएसएमएस, पुणे या कॉलेजमधून पूर्ण केली. तसेच एम.टेक.चे पदव्युत्तर शिक्षण व्हीआयटी, वेल्लोर विद्यापीठामधून बायोमेडिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. एम.टेक.ची अंतरवासीता (इंटर्नशिप) ही चंदिगड येथील सीएसआयओ या केंद्र शासनाच्या संस्थेत पूर्ण केली आहे. एम.टेक.नंतर त्यांनी एनआयटी रायपूर (नीट रायपूर) या केंद्र शासकीय संस्थेत प्रथम जेआरएफ व नंतर एसआरएफ म्हणून काम केले व पीएचडीसाठी प्रवेश घेतला आहे.
इंदापूरच्या भूमीपुत्राने जागतिक स्तरावर एक विशेष संशोधन केल्याने सर्वच स्तरातून घनश्याम क्षीरसागर यांचे कौतुक होत आहे.