शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ

By admin | Updated: March 22, 2017 03:20 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला असून

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला असून पदव्युत्तर व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून मंगळवारपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना येत्या ४ एप्रिलपर्यंत पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतील.विद्यापीठास्तरावर पदवीप्रदान समारंभ वर्षातून दोन वेळा आयोजित केला जातो. त्यातील पहिला पदवीप्रदान दिवाळीपूर्वी झाला असून आता दुसरा पदवी प्रदान समांरभ एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजन केले आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदवी प्रदान समांरभात प्रमाणपत्राचे वितरण केले जाईल. तर पदवी स्तरावरील प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयांमध्ये दिली जातील. विद्यार्थ्यांना येत्या ४ एप्रिलपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करता येईल. तर ५ ते १२ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाकडून विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. आॅनलाईज अर्जासोबत अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक असल्यास विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे शक्य होणार आहे. मात्र, सध्या आधार क्रमांक बंधनकारक केलेला नाही. परंतु, यापुढील काळात आधार क्रमांक अनिवार्य केला जाणार आहे.