शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

पाण्यासाठी जागरण

By admin | Updated: September 5, 2015 03:32 IST

शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या

पुणे : शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रेंजहिल्स, मरिआई गेट परिसर, पुणे विद्यापीठ परिसर, पंचवटी, पाषाण परिसराला रात्री ११ ते पहाटे ३ या वेळेत पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना जागरणं करावी लागणार आहेत.शहराला स्वारगेट, लष्कर, पर्वती, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर, वडगाव या केंद्रांमार्फत पाणीपुरवठा केला जातो. सोमवार, बुधवार व शुक्रवारी वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार भाग : बंडगार्डन विभागात येरवडा, कलवडवस्ती, आळंदी रोड, कल्याणीनगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ यांना पूर्वीप्रमाणेच वेळेत पाणीपुरवठा होईल. चंदननगर, वडगावशेरी, चौधरी वस्ती, थिटेनगर, खुळेवाडी, खराडकर पार्क, अभिरुची मॉल, हिंगणे परिसर, आपटे कॉलनी, खंडोबा परिसर, धायरी, डीएसके पायथा, साळुंखे विहार, कुदळे पार्क, विक्रांत पॅलेस, गोविंद अपार्टमेंट, विठ्ठलवाडी, महालक्ष्मी सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, मारुतीनगर, माणिकबाग या परिसरामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होईल. मंगळवार, गुरुवार व शनिवारी पाणीपुरवठा होणारा भाग : स्वारगेट जलकेंद्रातील दांडेकर पूल, सर्व पेठा, राजाराम पुलाच्या अलीकडील भाग यांना सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. लष्कर विभागात मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, महंमदवाडी, वानवडी, कोंढवा गावठाण, कॅम्प, ससून हॉस्पिटल येथे पूर्वीप्रमाणेच वेळेत पाणीपुरवठा होईल. एसएनडीटी विभागामध्ये रामबाग कॉलनी, काशीनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमाननगर या परिसरात सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होईल. कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, करिश्मा सोसायटी, मयूर कॉलनी, नळस्टॉप, सुतारदरा, कर्वेनगर कॅनॉल, म्हाडा वसाहत, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर पोलीस स्टेशन परिसर, शिवाजीनगर गावठाण, बोपोडी, औंध रोड, कामगार पुतळा येथील परिसरामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.