शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अटक टाळण्यासाठी ‘तो’ भोंदू रुग्णालयात

By admin | Updated: December 4, 2014 05:01 IST

ओळखीचा फायदा घेऊन २२ वर्षीय तरुणीवर गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी बदनामीची व जिवे मारण्याची धमकी दाखवीत बलात्कार

चाकण : ओळखीचा फायदा घेऊन २२ वर्षीय तरुणीवर गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी बदनामीची व जिवे मारण्याची धमकी दाखवीत बलात्कार करणाऱ्या आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील भोंदूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दोन दिवसांत त्याला अटक करण्यात येणार असल्याचे चाकण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.ह.भ.प. शिवदास शेणगावकर (वय ३५, रा. आळंदी, ता. खेड , जि. पुणे) असे कीर्तनकार भोंदूचे नाव असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत चाकण पोलिसात रविवारी (दि. ३०) संबंधित पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवदास शेणगावकरने चाकणमध्ये राहणाऱ्या या युवतीवर गेल्या काही महिन्यांपासून आळंदी , यवतमाळ येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. सततच्या या प्रकारांना कंटाळून अखेर पीडित युवतीने चाकण पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर शेणगावकरने अटकेच्या भीतीने प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण पुढे करीत रुग्णालयात दाखल होणे पसंत केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र येत्या दोन दिवसांत त्यांना गजाआड करणार असल्याचे स्पष्ट केले.याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांनी सांगितले, की या घटनेच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून, या घटनेमागे आणखी काही दडले आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून, पुढील सुरू आहे. सहायक निरीक्षक किशोर पाटील यांनी सांगितले, की शिवदास शेणगावकर सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत त्यांना अटक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.