शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अवसरी घाटात वाहतूककोंडी

By admin | Updated: November 10, 2014 05:15 IST

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पेठ-अवसरी घाटातील अवघड वळणावर मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वळणावर उलटला

पेठ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पेठ-अवसरी घाटातील अवघड वळणावर मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वळणावर उलटला. त्यानंतर या ट्रकच्या विरुद्ध दिशेने जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला. त्यामुळे घाटता सुमारे सहा तास वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप करावा लागला.पेठ-अवसरी (ता. आंबेगाव) घाटरस्ता हा आता अपघातांचा रस्ता म्हणून ओळखला जातो. नेहमीच्याच होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हा रस्ता वारंवार चर्चेत असतो. त्यातच आज पहाटे राजगुरुनगर बाजूकडून मालट्रक (यू.पी. ८० बी. टी ५६६०) मंचरच्या दिशेने येत होता. त्या वेळी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. त्यानंतर पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर दुपारी एक वाजता एक टेम्पो (एम.एच. ०४ एस ७३३३) राजगुरुनगरच्या दिशेने जात होता. ज्या ठिकाणी मालट्रक उलटला, त्याच ठिकाणाहून अवघ्या शंभर फूट अंतरावर टेम्पो बंद पडला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. टेम्पोचालकाने टेम्पो चालू करण्यासाठी खटाटोप केला. अखेर शेवटी एक तासाने टेम्पो सुरू झाला; मात्र त्यानंतर वाहतुकीची कोंडी सुटण्यास तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. प्रचंड मनस्ताप करत प्रवासी व वाहनचालक भर उन्हात वाहतूककोंडीला सामोरे जात होते. नेहमीचेच होणारे अपघात व नेहमीचीच होणारी वाहतूककोंडी यामुळे प्रवासी व वाहनचालक संतप्त झाले होते. निरीक्षक मोहन जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत पोलीस फाटा घेऊन आले. त्या वेळी वाहनकोंडी सुरळीत होण्यास मदत झाली. (वार्ताहर)