शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

कुतूहल जागृत ठेवण्याची जबाबदारी लेखकांची

By admin | Updated: June 1, 2016 00:57 IST

‘गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला झाला असला तरी मराठी मनात मराठी वाचनाची आवड कमी झालेली नाही. विज्ञानातील संकल्पना मराठी भाषेतच अधिक चांगल्या पद्धतीने समजतात

पुणे : ‘गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला झाला असला तरी मराठी मनात मराठी वाचनाची आवड कमी झालेली नाही. विज्ञानातील संकल्पना मराठी भाषेतच अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. त्यामुळे विज्ञान लेखकांवर विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. कुतूहल जागृत ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्याची गोडी लागेल,’ असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे डॉ. के. सी. मोहिते लिखित ‘सेरेन्डीपीटी’ अर्थात अनपेक्षित लागलेले शोध आणि वैशाली मोहिते लिखित ‘ती’च्या कविता या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवारी झाला. त्याप्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर बोलत होते. कार्यक्रमास चिंतन ग्रुपचे अध्यक्ष अभिनंदन थोरात, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त व संशोधन विभागप्रमुख डॉ. मंदा खांडगे, स्नेहवर्धन प्रकाशन संस्थेच्या डॉ. स्नेहल तावरे आदी उपस्थित होते. पंडित विद्यासागर म्हणाले, ‘‘इंग्रजी शाळांची संख्या वाढली असली तरी मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले विज्ञानविषयक लेखन वाचणाऱ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी विज्ञानातील संकल्पना मातृभाषेतून समजावून घेणे पसंत करतात. त्यामुळे विज्ञानलेखकांवर या विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. लेखकांनी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवर लिहिले पाहिजेत. विज्ञानामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि अचूकता असते. त्यात कल्पनारंजन आणता येत नाही. विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवणे अवघड आहे. मात्र, सतत काहीतरी लिहून ते जागे ठेवायला हवे.’’खांडगे यांनी के. सी. मोहिते व वैशाली मोहिते यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभिनंदन थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तकाविषयी माहिती देऊन वैशाली मोहिते व डॉ. के. सी. मोहिते यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली. तर डॉ. के. सी. मोहिते यांनी ‘लोकमत’च्या युरेका पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांवर आधारित सेरेन्डीपीटी या पुस्तकाविषयी माहिती दिली. वैशाली मोहिते यांनी याप्रसंगी आपल्या काही कवितांचे वाचन केले. तसेच काव्यलेखनाची पार्श्वभूमी सांगितली.