लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रवाशाचा मोबाइल, रक्कम, मौल्यवान वस्तू परत केल्याने रिक्षाचालकाचा गौरव नुकताच करण्यात आला. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाला आपल्या महागड्या वस्तू परत मिळाल्या.निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या कर्मचारी गणेश शिंदे यांच्या पत्नी पूनम कर्नावट-शिंदे या पुण्यात नोकरीस आहेत. मावळातील टाकवे येथे शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. पूनम या दररोज लोकलने नोकरीस जातात. पाच मे रोजी त्या नेहमीप्रमाणे पुणे स्टेशनला उतरल्या आणि रिक्षाने पुणे जिल्हा परिषद चौकात उतरल्या आणि रिक्षा निघून गेली. दरम्यान, काही वेळाने मोबाइल, पर्स रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, रिक्षाचालक, त्याचा पत्ता, वाहन क्रमांक काहीही माहिती नसल्याने त्या अस्वस्थ झाल्या. मोबाइल, पर्स, एटीएम, पॅन कार्डसह अडीच हजार रुपये पर्समध्ये होते. आता काय करायचे, मदत कोणाकडे मागायची अशी परिस्थिती निर्माण झाली. वस्तू गहाळ झाल्याची माहिती त्यांनी कुटुंबाला कळविली.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
By admin | Updated: May 11, 2017 04:26 IST