शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुलरच्या गारव्यातच प्रेक्षक ‘अ’समाधानी

By admin | Updated: June 20, 2016 00:49 IST

शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिराची पाहणी लोकमततर्फे करण्यात आली. या वेळी रंगमंदिरात बऱ्याच ठिकाणी डागडुजीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले

पिंपरी : शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिराची पाहणी लोकमततर्फे करण्यात आली. या वेळी रंगमंदिरात बऱ्याच ठिकाणी डागडुजीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वातानुकुलित सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कुलरच्या गारव्यात समाधान मानावे लागत आहे.अत्रे रंगमंदिरात साधारण आठशे आसनव्यवस्था आहे. त्यातही पन्नास खुर्च्या मोडकळीस आल्या आहेत, तर काहींची अवस्था खराब झाल्याने आहे त्या जागीच बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ७५० आसन व्यवस्थाच गृहीत धरली जाते, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बाल्कनीतील आसनांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यातील एकाच रांगेतील सुमारे चार ते पाच खुर्च्या कुशन खराब झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. समोरील भागातील १५० खुर्च्यांचे नूतनीकरण झाले आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी संत तुकारामनगर, वल्लभनगर परिसर जोडलेला आहे. वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या नाट्यगृहात मनुष्यबळ, सीसीटीव्ही कॅमेरा, अग्निशामक सुविधा, पे अँड पार्क, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह आदी पाहणी करण्यात आली. या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था अपुरी आहे. रंगमंचाच्या एकाच बाजूकडील असलेल्या स्वच्छतागृहात चार कक्ष आहेत. त्यातही स्वच्छतागृहांच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे एकच युनिट आहे, तसेच एअर कंडिशनिंगचीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कुलरच्या गारव्यात समाधान मानावे लागत आहे.अलीकडेच नूतनीकरण झाल्याने अग्निशामक सुविधा चांगल्या स्थितीत असल्याचे आढळले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत सभोवतालचा परिसर, प्रवेश कक्ष ते प्रेक्षागृहातील हालचाली टिपल्या जातात.त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत रंगमंदिर उजवे ठरले आहे.(प्रतिनिधी)